लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला शहराच्या मधोमध वाहणारी मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी असंख्य हात समोर येत आहेत. १३ जानेवारीपासून सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ मोर्णा’ आता वेग धरत आहे. मोर्णा स्वच्छ करण्याचे काम निरंतर चालू आहे. जिल्हा प्रशासनासोबत महानगरपालिका प्रशासन तसेच काही स्वयंसेवी संस्था आपला सहभाग दररोज देत आहे.मोर्णा नदीच्या गीता नगर भागातील खराब प्लॉस्टिक, जलकुंभी आणि कचरा यामुळे अतिशय कठीण असलेला थर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येत आहे. जिल्हाधिकार्यांनी सूचना दिल्याप्रमाणे त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने सदर भाग तोडून काढण्यात येत आहे. यासाठी दोन पोकलॅन्ड व २0 मजूर उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांच्या देखरेखीखाली काम करत आहेत. यासाठी लागणारे दोन पोकलॅन्ड लखन गावंडे व रेल्वेचे कंत्राटदार दीपक कारगल पुणे यांच्याकडून विनामूल्य प्राप्त झालेल्या आहेत. तहसीलदार संघटनेने दिलेल्या निधीतून १0 मजूर व मनपा प्रशासनाकडून १0 मजूर असे एकूण २0 मजूर काम करत आहेत. उप विभागीय अधिकारी संजय खडसे तसेच मनपाचे अधिकारी वेळोवेळी सहभाग घेऊन त्यांचा उत्साह वाढवत आहेत.आता नुकत्याच ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मिशन स्वच्छ मोर्णा’अभियानाचा उल्लेख करून जिल्हाधिकारी, मनपा अधिकारी सह अकोलेकरांचे कौतुक केल्यामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विविध संघटना स्वयंस्फूर्तीने मिशन स्वच्छ मोर्णामध्ये सहभाग नोंदवून श्रमदान करण्यासाठी पुढे येत आहेत. येत्या शनिवारी मिशन स्वच्छ मोर्णा अभियानात सहभाग घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला वेग; जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन लागले कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 01:05 IST
अकोला : अकोला शहराच्या मधोमध वाहणारी मोर्णा नदी स्वच्छ करण्यासाठी असंख्य हात समोर येत आहेत. १३ जानेवारीपासून सुरू असलेले ‘मिशन स्वच्छ मोर्णा’ आता वेग धरत आहे. मोर्णा स्वच्छ करण्याचे काम निरंतर चालू आहे. जिल्हा प्रशासनासोबत महानगरपालिका प्रशासन तसेच काही स्वयंसेवी संस्था आपला सहभाग दररोज देत आहे.
अकोला : मोर्णा स्वच्छता मोहिमेला वेग; जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन लागले कामाला
ठळक मुद्देस्वयंसेवी संस्था, नागरिकांचाही प्रतिसाद