शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला एमआयडीसीतील भूखंड वाटपात दलालांचा दबदबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 02:35 IST

अकोला :  एमआयडीसीतील भूखंडावर होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाच्या घटनेनंतर आता एमआयडीसीतील अनेक घबाड चव्हाट्यावर येत आहेत. एमआयडीसीतील भूखंड वाटपात दलालांची जास्त चलती असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देअकोला एमआयडीसी परस्पर तिसर्‍यालाही विकला वादग्रस्त भूखंड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  एमआयडीसीतील भूखंडावर होत असलेल्या अनाधिकृत बांधकामाच्या घटनेनंतर आता एमआयडीसीतील अनेक घबाड चव्हाट्यावर येत आहेत. एमआयडीसीतील भूखंड वाटपात दलालांची जास्त चलती असल्याने उद्योजक त्रस्त झाले आहेत. अकोला एमआयडीसी फेस क्रमांक-४ मधील एन-१६0 क्रमांकाचा सुनील चिराणीया यांचा भूखंड प्रादेशिक अधिकार्‍यांनी परस्पर विकल्याचा प्रकार समोर आला. याबाबत सखोल चौकशी केली, तेव्हा हा भूखंड परस्पर तिसर्‍यालाही विकला गेल्याचे समोर येत आहे. याचा मागोवा घेतला असता कोणत्या उद्योजकांचे भूखंड ठेवायचे आणि कुणाचे घालवायचे, याचे निर्णय काही दलाल घेत असल्याचे धक्कादायक माहिती मिळाली आहे. एमआयडीसीच्या अकोला, अमरावती, मुंबई कार्यालयातही या दलालांचा दबदबा कायम आहे. एमआयडीसीने ऑनलाइन भूखंड वाटपाची प्रक्रिया सुरू केली असली, तरी अजूनही भूखंड वाटपात अफरातफरीचे अनेक प्रयोग सुरू आहेत.  त्यामुळे  गरजवंत आणि नियमाने भूखंड घेण्याचा प्रयत्न करीत असलेल्या उद्योजकांवर अन्याय होत आहे. चिराणीया यांच्या प्रकरणातही त्यांना अकोल्यातील काही दलालांनी गळ घालून प्रकरण निपटविण्याचे सांगितले होते; मात्र त्याला भाव न दिल्याने दलाल आणि अधिकारी यांनी संगनमत करून त्यांचा भूखंड दूसर्‍यालाच अलॉट केला. विशेष म्हणजे ज्यांना हा भूखंड अलॉट केला होता त्यांच्याकडून तोच भूखंड दलालांनीच खरेदी केल्याचे समोर येत आहे.

अधिकार्‍यांवर दलालांची पकड अकोला शहरातील प्रमुख सात दलालांचीच एमआयडीसीच्या कामात चलती आहे. एमआयडीसीतील कोणतेही काम या दलालांशिवाय पूर्ण होत नाही. अमरावती आणि मुंबईतील कार्यालयात जाऊन हे दलाल पाहिजे त्या पद्धतीचे आदेश, शुद्धिपत्रक, दंडात्मक कारवाई करवून आणतात. त्यामुळे एमआयडीसीच्या अधिकार्‍यांपेक्षा दलालांचीच पकड मजबूत आहे.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ