शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला एमआयडीसी जलपुनर्भरणापेक्षा कूपनलिका खोदण्यातच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 15:21 IST

आपल्या परिसरात कोसळणाऱ्या पाण्याचे तरी जलपुनर्भरण करणे गरजेचे आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे.

ठळक मुद्देपाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग अडचणीत सापडले असून, येथील पाणीटंचाई उग्ररूप घेत आहे. एमआयडीसीतील सहाशेपैकी किमान दोनशे उद्योजकांकडे कूपनलिका आहेत. सहाशे उद्योगांपैकी केवळ बोटांवर मोजण्याएवढ्या साठ उद्योगांनी जलपुनर्भरणाची यंत्रणा लावली आहे.

अकोला : पाण्याअभावी अकोला एमआयडीसीतील शेकडो उद्योग अडचणीत सापडले असून, येथील पाणीटंचाई उग्ररूप घेत आहे. पाणीटंचाईची ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रशासन आणि एमआयडीसी इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची उदासीनता कारणीभूत ठरत आहे.मागील वर्षी पुरेसा पाऊस न पडल्याने अकोलेकरांवर जलसंकट आले आहे. एकीकडे पिण्यासाठी, तर दुसरीकडे उद्योगांना संजीवनी देण्यासाठी संघर्ष सुरू आहे. अकोल्यातील सहाशे उद्योगांना एमआयडीसी प्रशासनाकडून अत्यल्प पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पर्यायाने उद्योजकांना दररोज सातशे-पाचशे रुपयांप्रमाणे पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. पाणीटंचाईच्या काळात प्रत्येकाजवळ भूगर्भातील जलसाठा उपलब्ध व्हावा म्हणून किमान आपल्या परिसरात कोसळणाऱ्या पाण्याचे तरी जलपुनर्भरण करणे गरजेचे आहे. एमआयडीसी प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे. एमआयडीसीतील सहाशे उद्योगांपैकी केवळ बोटांवर मोजण्याएवढ्या साठ उद्योगांनी जलपुनर्भरणाची यंत्रणा लावली आहे. इतरांनी मात्र सर्व नियम धाब्यावर बसवून कूपनलिका खोदल्या आहेत. त्याला एमआयडीसी प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. वास्तविक पाहता, कूपनलिका खोदण्याआधी परवानगी आवश्यक आहे. मात्र, एमआयडीसीतील सहाशेपैकी किमान दोनशे उद्योजकांकडे कूपनलिका आहेत. यातील किती अधिकृत आणि किती अनधिकृत आहेत, याचा शोध यंत्रणेने घ्यावा. जेव्हा भीषण पाणीटंचाई भेडसावते, तेव्हा उद्योजकांना प्रशासन आणि शासनाची आठवण होते. पण, स्वत: याला ते किती जबाबदार आहेत, याचा उद्योजक विचार करीत नाही. पाणी पुरवठा पाइपलाइन टाकणे आणि कुंभारी तलावाचे हस्तांतरण होणे, या बाबी उद्योजकांच्या हाती नसल्या, तरी जलपुनर्भरण मात्र त्यांच्या हाती आहे. यासाठी एमआयडीसी इंडस्ट्रिज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सर्वांना सक्तीचे निर्देश द्यावे. जिल्हा प्रशासन आणि एमआयडीसी प्रशासनानेदेखील आपल्या नेहमीच्या चौकटी सोडून पुढाकार घेत, या कामाला गती द्यावी. तरच एमआयडीसीतील पाणीटंचाईचा सामना करणे शक्य होईल.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ