अकोला : तापत्या उन्हाचा पारा शुक्रवारी ४५ अंशावर पोहोचल्याने, प्रचंड उकाड्यात घामाच्या धारांनी अकोलेकर हैरान झाल्याचे जाणवत होते. तसेच कडाक्याच्या उन्हामुळे सूर्य आग ओकू लागल्याचा अनुभव येत होता.गेल्या १ जूनपासून पावसाळा सुरू झाला असला तरी, मान्सून दाखल होणे अद्याप बाकी असताना, तापत्या उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाचा कडका आणि अधून-मधून ढगाळ वातावरण, अशा वातावरणात उकाड्याने वैतागल्याचा अनुभव गेल्या आठ दिवसांपासून नागरिकांना येत आहे. शुक्रवार, ६ जून रोजी तर तापत्या उन्हाने कहरच केला, अकोल्याच्या तापमानाचा पारा ४५ अंश डिग्री सेल्सिअसवर पोहोचला. अंगाची लाही-लाही करणार्या तापत्या उन्हामुळे सूर्य आग ओकू लागल्याचा अनुभव येत होता. उन्हाच्या कडाक्यात प्रचंड उकाड्याने घामाच्या धारांनी अकोलेकर वैतागल्याचे चित्र दिसत होते. तापत्या उन्हामुळे प्रचंड उकाड्यामुळे नागरिक वैतागले असतानाच, वीज भारनियमनाच्या कालावधीत काही भागात तर प्रचंड उकाड्यामुळे घामाच्या धारांनी नागरिक अक्षरश: वैतागल्याचे चित्र दिसत होते.
अकोल्यात पारा ४५ अंशावर
By admin | Updated: June 7, 2014 01:05 IST