शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे कमाल तापमान पोहोचले ४३.९ अंशावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 10:38 IST

१६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता हे तापमान ४३.९ अंशावर पोहोचले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अकोल्याच्या कमाल तापमानात वाढ होत असून, गुरुवार, १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजता हे तापमान ४३.९ अंशावर पोहोचले. उन्हाचा चांगलाच कडाका वाढला असताना यावर्षी अद्याप कूलर सुरू झाले नसल्याचे शहरातील चित्र आहे.कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने देशात २३ मार्चच्या मध्यरात्रीपासून टाळाबंदी घोषित केली आहे. २१ दिवसांच्या या बंदीनंतर पुन्हा ३ मेपर्यंत टाळाबंदी आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व साहित्याची दुकाने बंद आहेत. त्यामुळे कूलर सुरू करणे अशक्य आहे; परंतु ज्यांच्याकडे कूलर आहेत, तेदेखील लावत नसल्याचे चित्र आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. एरवी फेब्रुवारी महिन्याचा शेवटी अथवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हमखास कूलर घरी सुरू करणारे आता थंड हवा या विषाणूला पोषक ठरू नये म्हणून अनेकजण कूलर लावण्याचे टाळत आहेत. अशातच अकोल्यात उन्हाचा कडाका वाढतच आहे.फेब्रुवारी महिन्यात वातावरण विषम होते. कधी पाऊस तर कधी ऊन असा खेळ सुरू होता. मार्च महिन्यातही यावर्षी अपेक्षित तापमान नव्हते. तथापि, एप्रिल महिना सुरू होताच ५ एप्रिल रोजी हे तापमान ३९.६ डिग्री सेल्सिअस होते. तेव्हापासून तापमानात वाढ सुरू झाली. ६ एप्रिल रोजी कमाल तापमानात ४१.४ पर्यंत वाढ झाली. ७ एप्रिल रोजी एक अंशाने घटून हेच तापमान ४०.८ पर्यंत आले.८ एप्रिल रोजी ४०.२ तर ९ एप्रिल रोजी ४१.३ पर्यंत वाढ झाली. १० एप्रिलला ४१.३, ११ ला ४२.० तर १२ एप्रिल रोजी ४२.८ वर पोहोचले. १३ एप्रिल रोजी राज्यात सर्वात जास्त ४३.८ पर्यंत पारा वाढला. १४ ला ४३.४ पर्यंत हे कमाल तापमान होते. १५ ला ४३.३ तर १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत हे कमाल तापमान ४३.९ अंशावर पोहोचले आहे.

कूलरचा व्यवसाय बुडाला! अकोल्याचा उन्हाळा बघता प्रत्येक वर्षी फेब्रुवारी महिन्यापासूनच कुलर खरेदी दुरुस्ती, कूलरला लागणारे गवत, अकोल्यात जोरात असतो. तथापि, यावर्षी कोरोनामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा हा व्यवसाय ठप्प पडला आहे. नागरिकही कूलर लावण्यास टाळत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTemperatureतापमान