शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : अर्जुनी-मोरगाव येथे गुरुवारी मराठी संत साहित्य संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:17 IST

अकोला : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन गोंदिया जिल्हय़ातील अर्जुनी-मोरगाव येथे   १५, १६ व १७ फेब्रुवारी २0१८ रोजी होणार आहे.

ठळक मुद्देकार्यक्रमांची रेलचेल डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर संमेलनाध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन गोंदिया जिल्हय़ातील अर्जुनी-मोरगाव येथे   १५, १६ व १७ फेब्रुवारी २0१८ रोजी होणार आहे. कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. यासह विविध खात्यांचे मंत्री, प्रसिद्ध संत साहित्यिक यावेळी उपस्थित राहणार आहेत. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, तर संत तुकाराम अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बार्टी) यांच्या सहभागातून होणार्‍या या संमेलनाबाबत समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी  दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते दिंडी सोहळयाचा शुभारंभ होणार आहे. सकाळी १0 वाजता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ होणार आहे. यावेळी संत तुकाराम अध्यासन केंद्राचे अध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर हे गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडून संमेलनाध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत. शनिवार, १७ फेब्रुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संमेलनाचा सांगता समारोप व सत्कार सोहळा संपन्न होणार असून, प्रमुख अतिथी म्हणून माणिकराव ठाकरे, उपसभापती, विधान परिषद महाराष्ट्र, दिलीप कांबळे राज्यमंत्री, सामाजिक न्याय, विजयबापू शिवतारे, राज्यमंत्री, जलसंपदा, अमरीशराज आत्राम, राज्यमंत्री, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य यांची उपस्थिती लाभणार आहे.

विविध पुरस्कारांचे होणार वितरण वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र पुरस्कृत ‘वारकरी विठ्ठल पुरस्कार’ महाराष्ट्र राज्यामध्ये अमूल्य कार्य केल्याबद्दल मरणोत्तर पुरस्कार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जाहीर करण्यात आला असून, जनार्दन बा. बोथे, सरचिटणीस, अ.भा.गुरुदेव सेवा मंडळ, मोझरी हे पुरस्कार स्वीकारणार आहेत. वारकरी संप्रदायाच्या विशेष सेवेसाठी ‘जीवनगौरव पुरस्कार’ संत गाडगे महाराज मिशन नागरवाडी जि. अमरावती यांना जाहीर झाला असून, हा पुरस्कार बापुसाहेब देशमुख स्वीकारणार आहेत.