लोकमत न्यूज नेटवर्कमाझोड (अकोला): गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरीत्या नळ कनेक्शन घेऊन फुकटात पाणी भरणार्या सर्व अवैध नळधारकांवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. यात सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी त्यांच्या भावाचे अवैध नळ कनेक्शनसुद्धा कापले, हे विशेष.माझोड ग्रा.पं.च्या वतीने स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्यात येते; परंतु जवळपास ७0 ते ७५ नागरिकांनी अवैधरीत्या नळ कनेक्शन घेऊन मोफत पाणीपुरवठय़ाचा लाभ अनेक दिवसांपासून घेत होते. यामध्ये सरपंचाच्या ना तेवाइकांचासुद्धा समावेश होता; परंतु ग्रा. पं. प्रशासनाच्या वतीने अवैध नळ वैध करून घेण्याची कारवाई करण्यात आली. ज्यांनी अनामत रक्कम भरली नाही अशांचे नळ कट करण्यात आले. यामध्ये सरपंचाच्या भावासह इतरही ना तेवाइकांचे अवैध नळ कापण्यात आल्याने ग्रामस्थांना कारवाईत भेदभाव दिसला नाही. त्यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. या धडक कारवाईत सर पंच ज्योत्स्ना खंडारे, उपसरपंच विद्याधर बराटे, ग्रामसेविका मनोरमा पोटे, ग्रा. पं. सदस्य राजेश ठाकरे, संतोष पाटील, पोलीस पाटील शंकरराव ढोरे, तंटामुक्ती अध्यक्ष रमेश हरवते, गजानन लाहुडकार, शाळा समिती अध्यक्ष केशव हागे, संतोष नेरकर, ओम डोंगरे, अमोल काळे, अनिल भड, ग्रा. पं. कर्मचारी संजय बंड, ज्ञानेश्वर सावरकार आदींसमवेत इतरही ग्रामस्थ सहभागी झाले होते.
अकोला : माझोडच्या महिला सरपंचने कापले सख्ख्या भावाचे अवैध नळ कनेक्शन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 20:34 IST
माझोड (अकोला): गेल्या अनेक वर्षांपासून अवैधरीत्या नळ कनेक्शन घेऊन फुकटात पाणी भरणार्या सर्व अवैध नळधारकांवर ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने धडक कारवाई करण्यात आली. यात सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी त्यांच्या भावाचे अवैध नळ कनेक्शनसुद्धा कापले, हे विशेष.
अकोला : माझोडच्या महिला सरपंचने कापले सख्ख्या भावाचे अवैध नळ कनेक्शन!
ठळक मुद्देअनेक दिवसांपासून घेत होता मोफत पाणीपुरवठय़ाचा लाभमाझोड ग्रा.पं.च्या सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांची धडक कारवाई