शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोला लॉकडाऊन : बाजारपेठा बंद , रस्त्यांवर शुकशुकाट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 12:19 IST

शनिवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊनला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अकोला शहर व जिल्ह्यात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाही केला आहे. शनिवारी पहिल्या दिवशी लॉकडाऊनला नागरिक व व्यापाºयांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याची शहरे व मोठ्या गावांमध्ये बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. केवळ वैद्यकीय सेवा, औषधांची दुकाने व काही पेट्रोलपंपाचा अपवाद वगळता सर्वत्र बंद असल्याने बाजारपेठा व रस्त्यांवर शुकशुकाट पहावयास मिळत आहे.पश्चिम विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा अशी कुप्रसिद्धी झालेल्या अकोल्यात कोरोनाचे आतापर्यंत २०६१ रुग्ण आढळून आले असून, आतापर्यंत १०० जणांचा बळी गेला आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा प्रशासन हतबल झाले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या उद्देशाने पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्ह्यात १८ ते २० जुलै दरम्यान तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनची अंमलबजावणी शुक्रवारी सायंकाळी ७ वाजतापासूनच सुरु झाली असून, शनिवारी पहिल्या दिवशी अकोला शहरातील सर्वच बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. संचारबंद असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट आहे. अकोला शहरातील वर्दळीचे समजले जाणारे  गांधी मार्ग, टिळक मार्ग, नेकलेस रोड टॉवर चौक, सीटी कोतवाली चौक, रतनलाल प्लॉट चौक, सिव्हिल लाइन चौक, जठारपेठ चौक या भागांमध्ये शनिवारी सकाळपासूनच कमालीची शांतता दिसून आली. एखाद-दुसºया वाहनांचा अपवाद वगळता शहरातील सर्वच रस्ते निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले. 

पोलिसांचा चोख बंदोबस्तलॉकडाऊनची अंमलबजावणी चोखपणे व्हावी यासाठी शहरात विविध ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विनाकारण बाहेर फिरणाºयांवर पोलिस करडी नजर ठेऊन आहेत. येणाºया-जाणाºयांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

तालुक्यांमध्ये कडकडीत बंदकोरोनाचे रुग्ण जिल्हाभरात आढळून येत असल्याने संपूर्ण जिल्ह्यातच तीन दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. शनिवारपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनला अकोट, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी, मुर्तीजापूर शहरांमध्येही लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला आहे. बाजारपेठा बंद असून, रस्ते सामसुम झाल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या