शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : कंटेनर, मालवाहू वाहनामधील ५२ गुरांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 02:08 IST

अकोला : कंटेनरमध्ये कोंबून नेण्यात येणार्‍या ५२ गुरांची अकोला पोलिसांनी श्निवारी रात्री  सुटका केली असून, गुरांची तस्करी करणार्‍या टोळीला जेरंबद केले. रविवारी त्यांच्यावर बाळापूूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.त्यांच्याकडून २२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ठळक मुद्दे२२ लाखांचा मुद्देमाल जप्तविशेष पथकाची मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कंटेनरमध्ये कोंबून नेण्यात येणार्‍या ५२ गुरांची अकोला पोलिसांनी श्निवारी रात्री  सुटका केली असून, गुरांची तस्करी करणार्‍या टोळीला जेरंबद केले. रविवारी त्यांच्यावर बाळापूूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.त्यांच्याकडून २२ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.नागपूरवरून औरंगाबादकडे गुरांनी खचाखच भरलेला  कंटेनर व्याळा येथून जात असताना तसेच बाळापूरकडून अकोल्याकडे येत असलेली महिन्द्रा बोलेरो या दोन वाहनांवर पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाने शनिवारी रात्रभर पाळत ठेवून दोन्ही ही वाहने पकडली. गुरांनी भरलेला कंटेनर जात असल्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांना मिळाली होती. त्यांनी शनिवारी मध्यरात्री या मार्गावर सापळा लावला होता. या कारवाईत गुरांना नेणारा तस्कर मो. वसीम मो. शमी, रियाज अहमद अब्दुल गणी, सलीम कुरेशी मो. तस्लीम कुरेशी, मो. शाहरूख कुरेशी रफिक कुरेशी सर्व राहणार टेकानई बस्ती, आझाद नगर नागपूर या आरोपींना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून २८ म्हैस किंमत २ लाख ८0 हजार, वगार १६ किंमत १ लाख २८ हजार, कंटेनर १२ लाख, मोबाइल २0 हजार, असा एकूण १६ लाख २८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बाळापूरकडून अकोल्याकडे येत असलेल्या बोलेरो महिन्द्रा पीकअप या वाहनामध्ये आठ गोवंश कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाने पुन्हा सापळा रचला् त्यातील  ८0 हजार रुपये किमतीच्या गुरांना जीवदान दिले. बोलरो गाडी किंमत ४ लाख रुपये, दोन मोबाइल किंमत १२ हजार रुपये, असा एकूण ४ लाख ९२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मो. मुस्ताक मो. याकुब, शे. फिरोज शे. दाऊद दोघेही राहणार बाळापूर या आरोपींवर कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाईत सुमारे २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

औरंगाबादला नेत होती गुरे!नागपूरवरून औरंगाबादाला म्हैस व त्यांच्या पिल्लांना कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आतापयर्ंत गुरांच्या चार कारवाईत ८१ गोवशांना जीवनदान दिले, तर रविवारी केलेल्या कारवाईत ५२ गुरांना, अशा एकूण १३३ गुरांना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने जीवनदान दिले. अकोल्यातील सर्वात मोठी कारवाई पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केली. 

हे तस्कर झाले फरारशेख सगीर रा. बाळापूर, अहमद शेख, अहमद, अखिल कुरेशी, अश्पाक कुरेशी, फारूक कुरेशी, वसीम कुरेशी, शेख रहीम, मो. मिया सर्व राहणार नागपूर व धनपाल कुर्जेकर राहणार भंडारा हे सर्व आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी           दिली.

टॅग्स :Akola cityअकोला शहर