शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : मजुरांना मिळेना मजुरी; झाडांना नाही पाणी! अधिकाऱ्यांच्या बहिष्काराचा फटका 

By संतोष येलकर | Updated: April 24, 2023 17:20 IST

जिल्ह्यात ‘नरेगा’ची कामे ठप्प

अकोला : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ( नरेगा ) अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामे करण्यास गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकाऱ्यांसह संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. गेल्या १२ दिवसांपासून अधिकाऱ्यांनी ‘नरेगा’ कामांवर बहिष्कार टाकल्याने, जिल्ह्यातील ‘नरेगा’ अंतर्गत कामे ठप्प झाली आहेत. त्यामध्ये कामांवरील मजुरांना मजुरी मिळत नसल्याने, तापत्या उन्हात झाडांना पाणी देण्यासह वृक्ष संगोपनाची कामेही थांबली आहेत.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्रामपंचायती आणि यंत्रणास्तरावर कामे केली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत स्तरावरील मोठ्या प्रमाणात कामे करण्यात येतात. या कामांची अंमलबजावणी पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदमार्फत केली जाते; परंतु पंचायत समितींचे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी (नरेगा) आदींसह महाराष्ट्र विकास सेवा राजपत्रित अधिकाऱ्यांनी गेल्या ११ एप्रिलपासून ‘नरेगा’ची कामे करण्यास नकार दिला आहे.

संबंधित अधिकाऱ्यांचा बहिष्कार असल्याच्या पार्श्वभूमीवर गेल्या १२ दिवसांपासून जिल्ह्यात ‘नरेगा’ अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरील कामे ठप्प झाली आहेत. त्यामध्ये ‘नरेगा’ची कामे करणाऱ्या मजुरांच्या मजुरी मस्टरवर संबंधित गटविकास अधिकाऱ्यांकडून (बीडीओ) स्वाक्षरी केली जात नसल्याने, मजुरांना मजुरी मिळणे बंद झाले. केलेल्या कामाची मजुरी मिळत नसल्याने मजुरांनी काम करणे बंद केले आहे. त्यामध्ये तीन वर्षांपूर्वी वृक्ष लागवडीमध्ये लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची कामे ठप्प झाली असून, तापत्या उन्हात झाडांना जगविण्यासाठी पाणी देण्याचे कामही बंद पडले आहे.पाणी देणे बंद; झाडे कोमेजू लागली !‘नरेगा’ अंतर्गत दरवर्षी करण्यात येणाऱ्या वृक्ष लागवडीत लावण्यात आलेली झाडे जगविण्यासाठी तीन वर्षे वृक्ष संवर्धनाची कामे केली जातात. त्यामध्ये झाडांना पाणी देणे, झाडाच्या अवती भोवती असलेले गवत, काडीकचरा साफ करणे, काटेरी कुंपण घेणे आदी कामे मजुरांकडून केली जातात; परंतु गेल्या १२ दिवसांपासून मजुरी मिळत नसल्याने ही कामे ठप्प झाली. त्यामध्ये जीवाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाच्या दिवसांत झाडांना पाणी देण्याचे काम बंद पडल्याने, जिल्ह्यातील विविध भागात लावण्यात आलेली झाडे रखरखत्या उन्हात आता कोमेजण्याच्या मार्गावर आहेत.