शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : कुंभारी तलाव आटतोय अन् विहीर अधिग्रहणाचा पत्ता नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 01:33 IST

अकोला : अकोल्यातील उद्योगांना पाणी पुरवठा करणारा कुंभारीचा तलाव आटत असून दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाकडून अजूनही विहीर अधिग्रहणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देअजूनही विहीर अधिग्रहणाला सुरुवात झालेली नाही उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोल्यातील उद्योगांना पाणी पुरवठा करणारा कुंभारीचा तलाव आटत असून दुसरीकडे एमआयडीसी प्रशासनाकडून अजूनही विहीर अधिग्रहणाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.यंदा पुरेसा पाऊस न पडल्याने अकोला जिल्हय़ातील धरण साठे कोरडे आहेत. जूनपासून ही स्थिती उद्योजक आणि प्रशासनाच्या समोर होती. महान काटेपूर्णा धरणातून अकोला एमआयडीसीतील शेकडो  उद्योगांना पाणी पुरवठा होत असे. दरम्यान, पिण्यासाठी पाणी राखीव केल्याने खांबोरा प्रकल्पाच्या पाणी पुरवठय़ासोबतच एमआयडीसीचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. त्यामुळे एमआयडीसीजवळच्या कुंभारी तलावातून उद्योगांना पाणी पुरवठा सुरू झाला. तो अजूनही तीन दिवसांआड काही तासांसाठी सुरू आहे. यादरम्यान अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनचे पदाधिकारी आणि जागरूक उद्योजकांनी एमआयडीसी प्रशासनाचे लक्ष आगामी पाणीटंचाईकडे वेधले; मात्र एमआयडीसी प्रशासनाने याकडे गंभीरतेने लक्ष दिले नाहीत. त्यामुळे एकापाठोपाठ एक उद्योग बंद पडू लागले आहेत. ही बाब एमआयडीसीतील फुड एक्स्पोच्या उद्घाटनादरम्यान उद्योगमंत्री  सुभाष देसाई यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी पंधरवड्यात याप्रकरणी मुंबईत बैठक आयोजीत केली आहे हे विशेष.

मिनरल प्लान्टकडून उपसा सुरूचपाण्याअभावी एमआयडीसीतील उद्योग बंद पडत असले, तरी येथील काही मिनरल प्लान्टकडून पाण्याचा उपसा सातत्याने सुरूच आहे. त्यांचा पाणी उपसा बंद करण्याची आणि परिसरातील विहिरी अधिग्रहित करण्याची गरज अजूनही एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंता यांना भासलेली नाही. 

अकोला एमआयडीसीतील पाणी समस्या तातडीने सोडविली गेली नाही, तर मार्चपर्यंत अकोल्यातील ७५ टक्के उद्योग बंद पडतील. याला अकोला एमआयडीसीतील अधिकारी जबाबदार राहतील. पाणीटंचाईची समस्या नैसर्गिक असली, तरी ती सोडविणे अशक्य मुळीच नाही. उद्योगमंत्री यांच्या बैठकीतही विहीर अधिग्रहणाचाच मुद्दा पुढे येणार आहे.-वसंत बाछुका, उद्योजक अकोला.

टॅग्स :Akola MIDCअकोला औद्योगिक विकास महामंडळ