शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : सिंचन विहीर घोटाळा; जबाबदारी निश्‍चित होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 01:45 IST

अकोला : गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देत लाभार्थींची फसवणूक करण्यासोबतच शासकीय योजनेत घोळ करणार्‍या बाळापूर पंचायत समितीमधील सर्वसंबंधितांची जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू आहे.

ठळक मुद्देबाळापूर, मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये १0९५ विहिरींचा घोळ

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देत लाभार्थींची फसवणूक करण्यासोबतच शासकीय योजनेत घोळ करणार्‍या बाळापूर पंचायत समितीमधील सर्वसंबंधितांची जबाबदारी निश्‍चित करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या महाराष्ट्र रोजगार हमी कक्षाकडून गटविकास अधिकार्‍यांना डिसेंबरमध्येच नोटीस देत जबाबदार असलेल्यांची माहिती पाठवण्याचे बजावण्यात आले. मूर्तिजापूर तालुक्यातील ८१६ विहिरींच्या घोळासाठी तत्कालीन गटविकास अधिकार्‍यांची विभागीय चौकशी सुरू असल्याचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी सांगितले.बाळापूर तालुक्यात सिंचन विहिरींसाठी ६४५ लक्ष्यांक असताना ९२४ लाभार्थींना मंजुरी आदेश देण्यात आले. त्यापैकी २७९ आदेशांची पंचायत समिती कार्यालयात कुठेच नोंद नाही. दुसरीकडे लाभार्थींना मिळालेल्या पत्रानुसारच त्यांनी विहिरींचे काम सुरू केले. त्या लाभार्थींवर आता देयकासाठी चकरा मारण्याची वेळ आली आहे. कार्यालयाबाहेरच आदेश तयार करून त्यापोटी लाभार्थींकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार अधिकारी-दलालांनी केल्याचे उघड झाले. त्याचवेळी आदेश कार्यालयाबाहेर असताना त्या लाभार्थींना पहिला, दुसर्‍या हप्त्याची रक्कम पंचायत समितीकडून देण्यात आली. एका लाभार्थींला तर २ लाख १६ हजार रुपये दिल्यानंतर त्याची विहीर लक्ष्यांकाबाहेर असल्याचे सांगत पुढील हप्ता देण्यास नकार देण्यात आला. या प्रकाराने त्रस्त लाभार्थींनी बुधवारी जिल्हा परिषदेत धाव घेतली. यावेळी सदस्य विलास इंगळे यांनी बाळापूरचे गटविकास अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी विहिरींची चौकशी सुरू असल्याने लाभार्थींना देयक अदा करण्यात अडचणी असल्याचे सांगितले.   

कार्यालयात नोंद नसताना हप्ता दिलाच कसा..१४ डिसेंबर रोजी स्थायी समितीच्या सभेत गटविकास अधिकारी शिंदे यांनी विहिरींच्या २७९ आदेशांची कार्यालयात नोंदच नसल्याचे सांगितले होते. लाभार्थींनी कार्यारंभ आदेश न घेताच काम सुरू केले. त्यामुळे मंजूर लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरींना पैसे देता येणे शक्य नसल्याचे सांगितले होते. मात्र, त्यापैकी अनेक लाभार्थींंना पहिल्या-दुसर्‍या हप्त्याची रक्कम दिल्यानंतर आता विहीर लक्ष्यांकात नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लाभार्थी मेटाकुटीस आले आहेत.

पात्र वगळून अपात्र लाभार्थींना हप्तेतालुक्यात मंजूर लक्ष्यांकाएवढय़ा लाभार्थींंना विहिरींचा निधी देणे आवश्यक आहे. त्यासाठी ज्यांचे मंजूर आदेश लक्ष्यांकपूर्तींंच्या संख्येएवढे आणि आधीचे आहेत, त्यांना रक्कम मिळण्याऐवजी उशिराने आदेश मिळालेल्यांना दोन ते तीन हप्ते दिल्याची माहिती लाभार्थींंसह सदस्य विलास इंगळे यांनी दिली. 

तत्कालीन संबंधितांची माहिती मागवलीबाळापूर तालुक्यातील ज्या गावांमध्ये लक्ष्यांकापेक्षा अधिक विहिरी मंजूर झाल्या. मंजुरी प्रक्रियेतील जबाबदार असलेल्या सर्वांंची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांनी मागवली. त्यामुळे आता लवकरच संबंधितांवर कारवाईची शक्यता आहे.

मूर्तिजापूरचे श्रीवास्तव यांची विभागीय चौकशीतालुक्यातील लक्ष्यांकापेक्षा ८१६ विहिरींना मंजुरी दिल्याप्रकरणी मूर्तिजापूर पंचायत समितीचे तत्कालीन गटविकास अधिकारी श्रीवास्तव यांची खातेचौकशी सुरू करण्यात आली. त्या प्रकरणातील जबाबदार असलेल्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणBalapurबाळापूर