शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

अकोला : जिल्हय़ातील सर्वच शहरात सीसी कॅमेरे बसवणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 01:05 IST

अकोला : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी सीसी कॅमेरे तातडीने बसवा, नादुरुस्त प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा तातडीने दुरुस्त करा, तसेच विविध योजनेतील घरकुले तत्काळ लाभार्थींना वितरित करा, असा आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला.

ठळक मुद्देपुढील वर्षासाठी २२0 कोटी रुपयांचा आराखडा पीएचसी, शाळा तातडीने दुरुस्त करा!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अकोला शहरासह जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी सीसी कॅमेरे तातडीने बसवा, नादुरुस्त प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषदेच्या शाळा तातडीने दुरुस्त करा, तसेच विविध योजनेतील घरकुले तत्काळ लाभार्थींना वितरित करा, असा आदेश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी शनिवारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिला. पुढील वर्ष २0१८-१९ साठी २२0 कोटी १२ लाख १९ हजार रुपये खर्चाच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या सभेत जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे, खासदार संजय धोत्रे, महापौर विजय अग्रवाल, आमदार सर्व गोपीकिशन बाजोरिया, गोवर्धन शर्मा, रणधीर सावरकर, हरीश पिंपळे, बळीराम सिरस्कार, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, प्रभारी मुख्य कायर्कारी अधिकारी सुभाष पवार, जिल्हा नियोजन समितीचे नवनियुक्त सदस्यांसह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. सभेत सन २0१८-१९ या आर्थिक वर्षासाठी नियोजन समितीच्या माध्यमातून शासनाने घालून दिलेल्या वित्तीय र्मयादेत २२0 कोटी १२ लाख १९ हजार रुपयांचा वित्तीय आराखडा तयार करण्यात आला. त्यामध्ये सर्वसाधारण योजनेचे ११५ कोटी ६५ लाख, अनुसूचित जाती उपयोजनेच्या ८३ कोटी ९५ लाख, तर आदिवासी उपयोजनेसाठी २0 कोटी ५२ लाख १९ हजार रुपयांचा समावेश आहे. या आराखड्याला सभेत मंजुरी देण्यात आली. अंमलबजावणी यंत्रणांनी मागणी केल्यानुसार जिल्ह्यातील अतिरिक्त मागणी २३७ कोटींची असून, वित्त मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या राज्यस्तरीय बैठकीत अतिरिक्त मागणीचा ठराव मंजुरीसाठी प्रयत्न करू, असेही पालकमंत्री डॉ. पाटील यांनी सांगितले.  गेल्या वर्षात २0१७-१८ अंतर्गत विविध विभागांनी केलेल्या विकास कामांवरील खर्चाचा आढावा घेण्यात आला. मार्चपूर्वी संपूर्ण निधी खर्च करण्याबाबत निर्देश देण्यात आले. नावीन्यपूर्ण योजनेत मंजूर कामांना कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. तसेच डोंगरी विकास कार्यक्रमांतर्गत प्रास्तावित कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली. संचालन जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्‍वर आंबेकर, शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे समन्वयक प्रकाश अंधारे यांनी केले. 

पुनर्वसित गावांमध्ये आरोग्य केंद्र, स्मशानभूमीला मंजुरीतेल्हारा तालुक्यातील दिवानझरी व अकोट तालुक्यातील मोहाळा येथे नव्याने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. जनसुविधा योजनेंतर्गत सोमठाणा बुद्रूक, धारगड, गुल्लेरघाट, अमोना कासोद, तेल्हारा तालुक्यातील बारुखेडा या पुनर्वसित गावांत नवीन ग्रामपंचायत इमारत व स्मशानभूमी विकास कामाला कार्योत्तर मंजुरी देण्यात आली. 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणAkola cityअकोला शहरAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालय