शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

वसुलीचा तगादा लावणाऱ्या सोने तारण , मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कारवाईचे संकेत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 11:03 IST

वसुलीचा तगादा लावणाऱ्या अकोला जिल्ह्यातील २८ कंपनींच्या हालचालीवर लक्ष.

- संजय खांडेकर

अकोला : कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी लावलेल्या लॉकडाउन दरम्यान कर्ज वसुलीची बळजबरी करीत शासन आदेशाची पायमल्ली करणाऱ्या सोने तारण आणि मायक्रो फायनान्स कंपनीवर आता कारवाई होण्याचे संकेत आहेत. वसुलीच्या नोटीस पाठविणाºया कंपन्यांचा शोध सुरू झाला असून, अकोला जिल्ह्यातील २८ मायक्रो फायनान्स कंपनीवर आता लीड बॅकेने लक्ष केंद्रित केल्याची माहिती आहे.कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी देशभरात लावण्यात आलेल्या लॉकडाउनचा फटका सर्वसामान्य जनतेपासून तर श्रीमंत उद्योजकांना सोसावा लागत आहे. देशाच्या विकास दरावर परिणाम झाला असून, आर्थिक मंदीचा सामना करण्याची वेळ आलेली आहे. या काळात देशभरातील कर्जदारांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र आणि राज्य शासनाने तीन महिन्यांचे ईएमआय आणि त्यावरील व्याजात सुट देण्याची घोषणा केली. आरबीआयनेदेखील त्यास तातडीने मंजुरी दिली आहे. असे असतानादेखील राज्यातील सोने तारणआणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जदारांना नोटिसेस आणि एसएमएस पाठविले गेले. त्रासलेल्या कर्जदारांनी ही बाब लोकमतच्या लक्षात आणून दिली. शासन आणि आरबीआयच्या आदेशाची पायमल्ली होत असल्याचे वृत्त लोकमतने १५ एप्रिलच्या अंकात करताच, मायक्रो फायनान्स कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. आम्हाला शासनाकडून अद्याप कोणतेही निर्देश न आल्याने वसुलीची प्रक्रिया सुरू ठेवल्याची सारवासारव या कंपन्या करत आहेत. आता शासनाकडून कारवाई होऊ नये म्हणून या कंपन्या बॅक फुटवर गेल्या आहेत.-लवकरच आरबीआयची गाइडलाइनसोने तारण आणि मायक्रो फायनान्स कंपनी आरओसी अ­ॅक्टमध्ये असल्या तरी त्यांच्यावर लीड बँक कारवाई करू शकते. तसे निर्देश आले आहेत. अकोला जिल्ह्यात असलेल्या २९ कंपनीवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. जर कोणत्या कर्जदारास नोटीस किंवा एसएमएस येत असेल तर त्यांनी लीड बँकेकडे तक्रार नोंदवावी, त्यानुसार सदर कंपनीवर कारवाई करण्यात येईल. लवकरच यासंदर्भात आरबीआयची गाइडलाइन येत आहे, अशी माहिती अकोला लीड बँक व्यवस्थापक आलोक कुमार तारेनिया यांनी दिली आहे.

 

 

टॅग्स :Akolaअकोलाbankबँक