शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

अकोला : चौथ्या राष्ट्रीय डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन; महाराष्ट्राने आसामला  ७-१ ने केले पराभूत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 8:06 PM

अकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल  खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे.  संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी  महाराष्ट्र संघाचा सामना आसाम संघासोबत झाला. महाराष्ट्र संघातील  खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत ७-१ असा विजय मिळविला.

ठळक मुद्देराष्ट्रीय पातळीवरील डयुबॉल स्पर्धेचे प्रथमच अकोला आयोजन

नीलिमा शिंगणे-जगडअकोला : हॅण्डबॉल आणि रग्बी खेळासारखा खेळल्या जाणारा डयुबॉल  खेळाची प्रथमच अकोला येथे राष्ट्रीय पातळीची स्पर्धा आयोजित केली आहे.  संगीतकार वसंत देसाई क्रीडांगण येथे रविवारी चौथ्या राष्ट्रीय (१९ वर्षाआ तील मुले-मुली) डयुबॉल स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी  महाराष्ट्र संघाचा सामना आसाम संघासोबत झाला. महाराष्ट्र संघातील  खेळाडूंनी अतिशय सुंदर खेळप्रदर्शन करीत ७-१ असा विजय मिळविला.  मुलींच्या गटातील सामन्यात महाराष्ट्राला कर्नाटककडून 0-१ ने पराभव  स्वीकारावा लागला.मुलांच्या गटात दिल्ली, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश आणि गोवा संघाने आ पल्या प्रतिस्पर्धी संघावर विजय मिळविला. सकाळच्या सत्रात मुलींच्या गटा तील पहिला सामना दिल्ली व राजस्थान संघात झाला. दिल्लीच्या समीक्षाने दोन  गोल नोंदवित संघाला विजय मिळवून दिला. दुसरा सामना कर्नाटक व  महाराष्ट्र संघात झाला. कर्नाटकच्या श्रुतीने एक गोल करू न संघाला आघाडी  मिळवून दिली. सामन्याच्या अंतिम क्षणापर्यंत आघाडी कायम ठेवण्यात  कर्नाटक संघाला यश मिळाले. महाराष्ट्राला या सामन्यात पराभवाचे तोंड  पाहावे लागले.मुलांच्या गटात पहिला सामना बिहार व मध्य प्रदेश संघात झाला. बिहारने  एकतर्फी ४-१ असा विजय मिळविला. बिहारच्या मोनू निगम, पवन कुमार  यांनी प्रत्येकी दोन, तसेच मध्य प्रदेशच्या शिव राणा याने एक गोल केला. दुसरा  सामना आंध्र प्रदेश आणि तेलंगणा संघात होऊन आंध्र प्रदेशने ३-१ ने सामना  जिंकला. आंध्र प्रदेशचा जी. किरण याने दोन, जुनेद व तिवारी यांनी प्रत्येकी  एक गोल केला. तिसरा सामना गत राष्ट्रीय विजेता संघ गोवा व राजस्थान  संघात झाला. गोव्याचा इब्राहिम शेख याने तीन आणि उल्पात शेट याने दोन  गोल करू न सामन्यावर सहज विजय मिळविला. चौथा सामना महाराष्ट्र आणि  आसाम संघात खेळला गेला. महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळप्रदर्शन केले.  रोशन चंदनखेडे चार, प्रज्वल मुळे दोन आणि यश काटे याने एक गोल करू न  आसामचा धुव्वा उडविला. आसामच्या प्रसन्नाला एक गोल करण्यास यश  मिळाले. स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी खेळल्या गेलेल्या प्रदर्शनी  सामन्यात महाराष्ट्र संघाला गोवा संघाने १-३ अशा गुणांनी पराभूत केले.

 

टॅग्स :Sportsक्रीडाAkola cityअकोला शहर