शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

अकोला बार असोसिएशनच्या क्रिकेट स्पर्धेचे मंगळवारी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 22:06 IST

अकोला : अकोला बार असोसिएशनच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अँडव्होकेट क्रिकेट स्पर्धेला मंगळवार, १६ जानेवारीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर प्रारंभ होत असून, क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. 

ठळक मुद्देराज्यभरातील क्रिकेट चमू घेणार सहभाग!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अकोला बार असोसिएशनच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय रात्रकालीन अँडव्होकेट क्रिकेट स्पर्धेला मंगळवार, १६ जानेवारीपासून अकोला क्रिकेट क्लब मैदानावर प्रारंभ होत असून, क्रिकेट स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. १६ जानेवारी रोजी सायंकाळी ७-३0 वाजता स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. झेड. ख्वाजा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे  माजी अध्यक्ष अँड. बी.के. गांधी, अँड. मोतीसिंह मोहता, बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सत्यनारायण जोशी, क्रिकेट आयोजन समितीचे अध्यक्ष अँड. मुन्ना खान, बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अँड. गजानन खाडे, सचिव अँड. अनुप देशमुख, अँड. सुमित बजाज, अँड. इलियास शेखानी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.रात्रंदिवस खेळल्या जाणार्‍या या स्पर्धेचा प्रथम सामना स्पर्धेच्या उद्घाटनानंतर अकोला वकील संघ व न्यायाधीश संघ यांच्यात होणार आहे. तसेच अकोला महिला वकील संघ व महिला न्यायाधीश संघ यांच्यात प्रदर्शन सामने होणार आहेत. १६ ते २१  जानेवारीपर्यंत सायंकाळी ५ ते रात्री १0 पर्यंत आयोजित या रात्रकालीन अँडव्होकेट क्रिकेट स्पर्धेत औरंगाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, जळगाव, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, उमरखेड, खामगाव, बाळापूर, पातूर आदी भागातून महिला-पुरुष वकील चमू सहभागी होत आहेत. सहभागी चमूंची निवास व आहार व्यवस्था असोसिएशनच्यावतीने करण्यात येणार आहे. या स्पर्धेत नित्य तीन सामने खेळविण्यात येणार असून, उपांत्य फेरी २0 जानेवारी रोजी होऊन अंतिम लढत २१ जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणार्‍या अँडव्होकेट चमूने अँड. अजय गोडे, अँड. पवन बाजारे यांच्याशी संपर्क करून जिल्ह्यातील समस्त अभियोक्त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजन समितीचे अँड. अजय गोडे, अँड. पावन बाजारे, अँड. शंकर ढोले, अँड. संतोष वाघमारे, अँड. राहुल टोबरे, अँड. राहुल वानखडे, अँड. हरीश गोतमारे, अँड. विनय आठवले, अँड. भूषण जोशी, अँड. प्रशांत वाहुरवाघ, अँड. वसीम शेख, अँड. संतोष इंगळे, अँड. उमरीकर, अँड. अमोल क्षीरसागर, अँड. इलियास शेखानी, अँड. अमित डांगेसह बार असोसिएशन व आयोजन समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांनी केले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरCricketक्रिकेट