लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर या महिलेच्या नातेवाइकांचा पोलीस शोध घेत आहेत; मात्र या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीसही हैरान झाले आहेत. दगडी पुलानजीक एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याची माहिती रामदास पेठ पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवरेपचार रुग्णालयात पाठविला. जळालेल्या महिलेचे वय ६५ वर्षांच्या वर आहे. सदर महिला उभी असताना जळाली असल्याने तिच्या शरीरावरून ओळख पटण्यास प्रचंड अडचणी येत आहेत. सदर गंभीर प्रकरणाचा उत्तरीय तपासणीचा अहवाल आला; मात्र पोलिसांच्या हातात काहीही लागत नसल्याने पोलिसांनी या महिलेची ओळख पटविण्याचे आवाहन रामदास पेठ पोलिसांनी केले आहे.
अकोला : दगडी पुलानजीक जळालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:01 IST
अकोला: रायली जीन परिसरातील दगडी पुलानजीक एका ६५ वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानंतर या महिलेच्या नातेवाइकांचा पोलीस शोध घेत आहेत; मात्र या अनोळखी महिलेच्या मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलीसही हैरान झाले आहेत.
अकोला : दगडी पुलानजीक जळालेल्या अनोळखी महिलेची ओळख पटेना!
ठळक मुद्देपोलिसांकडून प्रयत्न सुरू; अंतिम संस्कार थांबले