शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : शेतात विनापरवाना उभारला ‘हॉटमिक्स प्लांट’; चौकशी करण्याचे ‘एसडीओं’चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 19:58 IST

अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत शनिवारपासून सुरु करण्यात आली असून, दंडात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.त्यासाठी चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोल्याच्या उपविभागीय अधिकाºयांनी (एसडीओ) तहसीलदारांना दिला आहे.

ठळक मुद्देबोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आला आहे. ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ संदर्भात शनिवार,६ जानेवारी ‘लोकमत’मध्ये वृत प्रकाशित करण्यात आले. संबंधित कंपनीविरुध्द दंड वसूल करण्याची कारवाई करण्याची तयारी महसूल प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.

- संतोष येलकर अकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ची चौकशी महसूल प्रशासनामार्फत शनिवारपासून सुरु करण्यात आली असून, दंडात्मक कारवाई करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.त्यासाठी चौकशी अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोल्याच्या उपविभागीय अधिकाºयांनी (एसडीओ) तहसीलदारांना दिला आहे.बोरगाव मंजू येथे ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ उभारण्यासाठी बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची जमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली आहे. भाड्याने घेतलेल्या २.३६ आर.जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ उभारण्यात आला आहे. तसेच कंपनीचे कार्यालय, लॅबचे बांधकामही करण्यात आले आहे. परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लांट सुरु करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही. कृषक जमिनीचा विना परवानगी वाणिज्य प्रयोजनासाठी अकृषक वापर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने विनापरवाना उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लांट’ संदर्भात शनिवार,६ जानेवारी ‘लोकमत’मध्ये वृत प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेत, अकृषक परवानी न घेता उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लांटची सविस्तर चौकशी करुन, अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना ६ जानेवारी रोजी दिला. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर विना परवानगी प्लांट उभारणाºया संबंधित कंपनीविरुध्द दंड वसूल करण्याची कारवाई करण्याची तयारी महसूल प्रशासनामार्फत सुरु करण्यात आली आहे.अकृषक परवानगी न घेता ‘हॉटमिक्स डांबर प्लांट ’ उभारण्यात आल्याने, यासंदर्भात चौकशी करुन सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश अकोला तहसीलदारांना देण्यात आला आहे. तसेच परवानगी न घेता कृषक जमिनीचा अकृषक वापर केल्यासंदर्भात संबंधित कंपनीविरुध्द लवकरच दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.-संजय खडसेउपविभागीय अधिकारी, अकोला.

 

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6