शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

अकोला : कापसाचा विमा नसलेल्या शेतकर्‍यांना मदत द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 02:46 IST

अकोला : गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला नसेल, तर त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ३७,५00 रुपये मदत देण्यासाठी स्वनिधीतून शासन तरतूद करणार काय, या मुद्यांसह विविध प्रश्नांवर शासनाला धारेवर धरण्याची तयारी येत्या अधिवेशनात विधान परिषदेतील आमदारांनी केली आहे. त्यासाठीच्या मुद्यांची माहिती विधिमंडळाकडून मागवण्यात आली आहे. 

ठळक मुद्देविरोधकांकडून सत्ताधार्‍यांना घेरण्याची तयारी! 

सदानंद सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : गुलाबी बोंडअळीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला नसेल, तर त्यांना शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ३७,५00 रुपये मदत देण्यासाठी स्वनिधीतून शासन तरतूद करणार काय, या मुद्यांसह विविध प्रश्नांवर शासनाला धारेवर धरण्याची तयारी येत्या अधिवेशनात विधान परिषदेतील आमदारांनी केली आहे. त्यासाठीच्या मुद्यांची माहिती विधिमंडळाकडून मागवण्यात आली आहे. जिल्हय़ात बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रचंड प्रादुर्भाव झाल्याने शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्याबाबत शेतकर्‍यांनी मोठय़ा प्रमाणात तक्रारी केल्या. पिकांवर गुलाबी बोंडअळी आढळल्याने शेतकरी हवालदिल झाले. त्यासाठी सातही तालुका कृषी अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन चौकशी करावी, शिवारातील किती क्षेत्रात बीटी कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला, याचा अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर शासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना हेक्टरी ३७,५00 रुपये मदत देण्याची घोषणा केली. त्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधी, बियाणे उत्पादक कंपन्यांकडून मोबदला, पीक विमा मदत आणि शासनाकडून ६८00 रुपये याप्रमाणे मदतीची रक्कम ठरवली. मात्र, या प्रकारामुळे ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा काढला नाही, त्यांना मदत देताना ३७,५00 रुपये मिळतील का, हा मुद्दा आमदारांनी उपस्थित केला आहे. पीक विम्याची भरपाई मिळणार नसल्याने शेतकर्‍यांना शासनाने जाहीर केलेली मदत मिळणे कठीण आहे. त्यासाठी शासन मदतीची उर्वरित रक्कम स्वनिधीतून देणार आहे का, असा प्रश्नच विधिमंडळात उपस्थित करण्यात आला आहे. त्यावर आता उत्तर देताना शासन चांगलेच अडचणीत येणार आहे. या मुद्यांवरून शासनाला घेरण्याची चांगलीच तयारी विरोधकांनी केली आहे. सोबतच मावा व तुडतुड्यामुळे धान पिकाचेही नुकसान झाले आहे. त्या शेतकर्‍यांना मदत मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे निधीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यातून किती मदत शेतकर्‍यांना मिळणार आहे, याचा लेखाजोखाही आमदारांनी मागवला आहे. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह २१ आमदारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांची उत्तरे विधानमंडळ सचिवालयाने मागवली आहेत. 

टॅग्स :Akola cityअकोला शहर