शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

Akola: अतिवृष्टीचा सर्व्हे चुकीचा; डाबकी गावकऱ्यांची तहसील कार्यालयात धडक

By रवी दामोदर | Updated: August 28, 2023 18:02 IST

Akola: डाबकी (भौरद) येथेही अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात महसूल विभागामार्फत सर्व्हे करण्यात आला आहे, परंतु हा सर्व्हे चुकीचा झाल्याचा आरोप करीत डाबकी (भौरद) येथील नागरिकांनी तहसील कार्यालयात धडक दिली.

- रवी दामोदर अकोला - अतिवृष्टीमुळे खरिप हंगामातील पिकांसह घरांची पडझड झाली होती. डाबकी (भौरद) येथेही अतिवृष्टीमुळे नागरिकांच्या घरांत पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यासंदर्भात महसूल विभागामार्फत सर्व्हे करण्यात आला आहे, परंतु हा सर्व्हे चुकीचा झाल्याचा आरोप करीत डाबकी (भौरद) येथील नागरिकांनी सोमवार, दि. २८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयात धडक दिली. याप्रसंगी संतप्त नागरिकांनी तहसीलदारांची भेट घेऊन पुन्हा सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली.

जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटीसदृश पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, कपाशी आदी पिकांना फटका बसला असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. डाबकी (भौरद) परिसरातही झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांत पाणी शिरले होते. घरातील अन्नधान्यांसह साहित्यांचे नुकसान झाले होते. यासंदर्भात महसूल विभागामार्फत सर्व्हे करण्यात आला. परिसरात खऱ्या नुकसानग्रस्तांना डावलले असून, चुकीचा सर्व्हे केल्याचा आरोप करीत डाबकी (भौरद) येथील नागरिकांनी तहसील कार्यालयात धडक दिली. यावेळी प्रभारी तहसीलदार शिंदे व मंडळ अधिकारी माहोरे यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे पराग गवई यांच्यासह विलास मोरे, आशिष मोरे, गजानन मोरे, मुकुंद मोरे, संजय मोरे, देवानंद मोरे, रामधन मोरे, किशोर मोरे, गंगुबाई मोरे, जानकाबाई घुगे, नामदेव ठाकरे, संगीता दहिवाले, बाबाराव गवई, प्रमोद सदाशिव, दुर्गा मोरे, भास्कर मोरे, मंदा वानखडे, सागर इंगळे, सुशीला इंगळे, मंगेश जगताप, मंगेश मोरे आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो)

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी