शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

Akola: शहराच्या विकास आराखड्यावर आजपासून हाेणार सुनावणी, हरकती,आक्षेप निकाली काढण्यास विलंब काेणाच्या पथ्यावर?

By आशीष गावंडे | Updated: May 20, 2024 21:09 IST

Akola News: महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या शहराच्या विकास आराखड्यावर(डेव्हलपमेंट प्लान) प्राप्त हरकती व सूचना निकाली काढण्यासाठी उशिरा का हाेइना, प्रशासनाने सुनावणीचा मुहूर्त निश्चित केला आहे.

- आशिष गावंडे अकोला - महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या शहराच्या विकास आराखड्यावर(डेव्हलपमेंट प्लान) प्राप्त हरकती व सूचना निकाली काढण्यासाठी उशिरा का हाेइना, प्रशासनाने सुनावणीचा मुहूर्त निश्चित केला आहे. लाेकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची सबब कामी आली असून २१ मे, २२ मे तसेच २७ मे ते ३१ मे पर्यंत सुनावणीची प्रक्रिया पार पडणार आहे. उण्यापुऱ्या सात दिवसांच्या कालावधीत सुनावणी प्रक्रिया पूर्ण हाेऊन मालमत्ता धारकांना न्याय मिळेल का, याकडे सुज्ञ अकाेलेकरांचे लक्ष लागले आहे. 

महापालिका प्रशासनाने १९ जानेवारी २०२४ राेजी शहराचा विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लान) प्रसिध्द केल्यानंतर त्यावर वेळेच्या मुदतीत सुनावणी घेऊन हरकती व आक्षेप निकाली काढणे अपेक्षित हाेते. तसे न करता प्रशासनाने हरकती,आक्षेप व सूचनांसाठी २३ फेब्रुवारी पर्यंतची मुदत दिली हाेती. प्रशासनासह ‘डीपी’साठी शासनाने गठीत केलेल्या नगररचना विकास योजना, विशेष घटक कार्यालयाच्या लेटलतीफ कारभारामुळे अनेक बड्या दलालांचे उखळ पांढरे हाेऊन अनेक मालमत्ता धारक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. नवीन ‘डीपी’मध्ये ले-आऊट केलेल्या जमिनी व भूखंडातून रस्ते प्रस्तावित करण्यात आले आहेत. हद्दवाढ क्षेत्रात अनेक शासकीय जागा पडीक असताना त्याऐवजी शेतीसह अनेक खासगी मालमत्तांमध्ये विविध प्रयाेजनांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आल्यामुळे शहरातील असंख्य मालमत्ता धारकांच्या ताेंडचे पाणी पळाले आहे. 

इ- क्लास, शासकीय जागांकडे दुर्लक्षशहरातील कृषक,अकृषक जमिनी, गुंठेवारी जमिन, लेआऊटच्या जमिनीवर आरक्षण निश्चित केल्यास भविष्यात मुळ मालकाला जागेचा आर्थिक माेबदला दिला जात नाही. त्यामुळे मुळ मालक न्यायालयात धाव घेतात. असे प्रकार पाहता शासकीय जागांवर आरक्षण निश्चित केल्यास तशा स्वरुपाच्या जागांचा वापर करणे प्रशासनाला साेयीचे ठरणार हाेते. परंतु सुधारित ‘डीपी’मध्ये इ क्लास तसेच शासकीय जागांकडे अर्थपूर्ण उद्देशातून कानाडाेळा करण्यात आल्याचे बाेलल्या जात आहे. 

मुंबईत गाेपनीय बैठकाशहराचा सुधारित विकास आराखडा निश्चित करण्यासाठी मनपातील तत्कालीन व प्रामाणीकतेचा आव आणनाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याने मुंबइत एका एजन्सीसाेबत अनेकदा गाेपनिय बैठक घेतल्याची माहिती आहे. स्थानिक राजकारण्यांच्या इशाऱ्यावरुन रस्ते, खेळाचे मैदान, झाेन निहाय बाजारपेठ, ग्रीन झाेन, पार्कीग, हॉकर्स झोन, शहर बस वाहतुकीसाठी स्थानक तसेच थांबे आदींसाठी खासगी मालमत्तांना लक्ष्य करण्यात आले. सुनावणीअंती निकषात न बसणारे आरक्षण हटतील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला