शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : गारपिटीने पळविला तोंडाशी आलेला घास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 02:07 IST

अकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.

ठळक मुद्देपिकांचे नुकसान; पंचनामे सुरुआसेगाव बाजार येथील १५0 घरांचे नुकसान शेतकर्‍यांना हवा मदतीचा हात 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अवकाळी पावसासह गारपिटीने जिल्ह्यात रब्बी पिकांसह भाजीपाल व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास गारपिटीने पळविल्याने, शेतकरी हवालदिल झाला असून, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवारपासून पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आले.रविवार, ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसासह अवकाळी गारपीट झाली. त्यामुळे जिल्ह्यातील सातही तालुक्यांत गहू, हरभरा या रब्बी पिकांसह संत्रा, केळी, टरबूज या फळ पिकांचे व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. गारपिटीने कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या शेतातील गहू, हरभर्‍याचे पीक उद्ध्वस्त झाले. हाताशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला. जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांकडून १२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात ५ हजार ७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनामार्फत वर्तविण्यात आला आहे. अवकाळी पावसासह गारपिटीच्या तडाख्यात नुकसान झालेल्या जिल्ह्यातील पिकांचे पंचनामे करून अहवाल तातडीने सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांसह सातही तहसीलदारांना दिला. त्यानुसार तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या पथकांमार्फत सोमवारपासून जिल्ह्यात गारपीटग्रस्त गावांतील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील पीक नुकसानाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

नुकसानाचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करा!अवकाळी पावसासह गारपिटीने पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत देण्यासाठी पीक नुकसानाचा अहवाल १७ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तहसीलदारांना दिला. त्यामध्ये पीकनिहाय नुकसानाचे क्षेत्र, बाधित शेतकर्‍यांची संख्या, पीक विम्याचा लाभ घेतलेले शेतकरी व पीक विमा योजनेत समाविष्ट नसलेल्या शेतकर्‍यांची संख्या इत्यादी माहितीचा अहवाल सादर करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पीक नुकसानाची मदत द्या; गारपीटग्रस्तांची मागणीअवकाळी पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाले. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस व गारपिटीने पळविला. त्यामुळे शासनाकडून पीक नुकसानाची मदत तातडीने देण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

घरांचे नुकसान! अवकाळी पाऊस व गारपिटीचा घरांनाही तडाखा बसला आहे. त्यामध्ये अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथे १५0 घरांचे अंशत: नुकसान झाल्याचा अहवाल अकोट तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.

या गावांना तडाखा तेल्हारा दानापूर, बेलखेड, पंचगव्हाण, खंडाळा, हिंगणी बु., हिंगणी खु., तळेगाव बाजार, वडगाव, सिरसोली, रायखेड, कोंढा, शेरी, मालठाणा, सांगवी, नेर, निंबोळी, माळेगाव बाजार, हिरवखेड 

अकोला पळसो बढे, निपाणा, कौलखेड जहाँ., भोड, सुकोडा, खडकी, टाकळी, सिसा, मासा बोंदरखेड, डोंगरगाव  

पातूर खेट्री, शिरपूर, चांगेफळ, पिंपळखुटा, राहेर, अडगाव, वहाळा, सावरगाव, चान्नी, उमरा, सुकळी, चतारी, सायवणी, दिग्रस बु., सस्ती 

बाश्रीटाकळी सायखेड, चेलका, धाबा, कान्हेरी सरप, सोनगिरी, सिंदखेड  

बाळापूर अंदुरा, कवठा बहादुरा, निंबा फाटा, बोरगाव वैराळे 

अकोट आसेगाव, सावरा, मंचनपूर, कुटासा, देवरी, मुंडगाव 

मूर्तिजापूर लाईत, दातावी, भटोरी, पारद