शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटलांनी साधला नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 18:54 IST

अकोला: बाभुळगाव परिसरातील जवाहर नवोदय विदयालयाला पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन प्राचार्य, शिक्षक व विदयार्थी यांच्याकडून तेथील समस्या जाणून घेतल्या.

ठळक मुद्देशुक्रवारी अचानक भेट देऊन प्राचार्य, शिक्षक व विदयार्थी यांच्याकडून तेथील समस्या जाणून घेतल्या.विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या खोलीची पाहणी करुन तेथील व्यवस्थेबाबत प्राचार्यांकडे विचारणा केली.विद्यालय परिसरात जिल्हा नियोजनमधून एक विहीर खोदण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

अकोला: बाभुळगाव परिसरातील जवाहर नवोदय विदयालयाला पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी शुक्रवारी अचानक भेट देऊन प्राचार्य, शिक्षक व विदयार्थी यांच्याकडून तेथील समस्या जाणून घेतल्या. पाणी टंचाईचा सामना करणाºया या विद्यालयाच्या परिसरात जिल्हा नियोजनमधून एक विहीर खोदण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.विद्यालयातील विविध समस्यांबाबत पालकांच्या आलेल्या तक्रारींची तातडीने दखल घेत शुक्रवारी सकाळी स्वत: पालकमंत्र्यांनी विद्यालयात जाऊन सर्वप्रथम सर्व वर्गखोल्यांची पाहणी केली. उपस्थित विद्यार्थ्यांची जिव्हाळयाने चौकशी केली. त्यांना कोणकोणत्या समस्या भेडसावतात याबाबतची माहिती जाणून घेतली. वगार्तील विद्यार्थ्यांची उपस्थिती, शाळेतील वातावरण, मेसमधून मिळणारा नाष्टा व जेवणाची गुणवत्ता, पाण्याची समस्या याबाबत चौकशी केली. तसेच आंघोळीसाठी गरम पाणी मिळते का याविषयी विद्यार्थ्यांना विचारणा केली.यानंतर विद्यार्थ्यांच्या वस्तीगृहाला भेट देऊन पाहणी केली. तेथील वीज, पाणी तसेच सीसीटीव्हीबाबत त्यांनी चौकशी केली. विद्यार्थ्यांच्या राहण्याच्या खोलीची पाहणी करुन तेथील व्यवस्थेबाबत प्राचार्यांकडे विचारणा केली. पाणीटंचाईची समस्या भेडसावणाºया या विद्यालयाला सध्या टँकरने पाणी पाणीपुरवठा होत आहे. यावर उपाय म्हणून पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजनमधून एक विहीर खोदण्यात येणार असल्याचे सांगितले. गरम पाण्यासाठी गिझर दुरुस्त करण्याची सूचना त्यांनी यावेळी प्राचार्यांना केली. इतर मुलभूत समस्यांचेही तातडीने निराकरण करण्याबाबत त्यांनी सूचित केले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सुमन बैलमारे, उपप्राचार्य डी.एस. थूल हे उपस्थित होते.

टॅग्स :Akola cityअकोला शहर