शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 17:59 IST

कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती बच्चू कडू यांनी त्यांच्या टिष्ट्वटर हँडलवरून दिली आहे.

अमरावती : अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे शनिवारी प्राप्त झालेल्या कोरोना चाचणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. त्यांच्या पत्नी नयना कडू आणि कुटुंबातील इतर १२ जणांना लागण झाली आहे. स्थानिक डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती रुग्णालयात त्यांनी कुटुंबीयांसह चाचणी करून घेतली. बच्चू कडू हे अकोला जिल्ह्याचे  पालकमंत्री आहेत. डॉक्टरांच्या सन्मानार्थ तेथील कोविड रुग्णालयात आपण उपचार घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार रविवारी सकाळी ते अकोला येथे उपचारार्थ दाखल होतील. कुटुंबातील इतर १२ जण अमरावतीच्या बख्तार रुग्णालयात इलाज घेणार असल्याची माहितीे ना. कडू यांनी ‘लोकमत’ला दिली. 

धनादेश वितरण कार्यक्रमाला उपस्थितीना. कडू शनिवारी दिवसभर अमरावती जिल्हा दौºयावर होते. दुपारी शासकीय विश्रामगृहात त्यांच्या हस्ते महावितरण कर्मचाºयांना ५० लाखांचे धनादेश वाटण्यात आले. यावेळी ५० पेक्षा अधिक व्यक्ती कार्यक्रमाला उपस्थित असल्याने एकच गहजब झाला आहे. या लोकप्रतिनिधींनाही झाला होता कोरोनाखासदार नवनीत राणा, बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा, वरूड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार, शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्रीकांत देशपांडे, दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनादेखील यापूर्वी कोरोना संक्रमण झाले आहे.

 

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूcorona virusकोरोना वायरस बातम्या