शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

अकोला : महापालिका ‘स्थायी’च्या सभापती पदासाठी विशाल इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:58 IST

अकोला : सर्वांचे अंदाज चुकवित भाजपाने स्थायी समिती सभापती पदासाठी विशाल श्रावण इंगळे यांच्या नावावर शिक्कमोर्तब करून इच्छुकांना धक्का दिला आहे. महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ १० असल्यामुळे विशाल इंगळे यांची निवड निश्चित असून, मंगळवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येईल. 

ठळक मुद्देभाजपाने इच्छुकांना दिला ‘दे धक्का’ आज होणार निवड प्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सर्वांचे अंदाज चुकवित भाजपाने स्थायी समिती सभापती पदासाठी विशाल श्रावण इंगळे यांच्या नावावर शिक्कमोर्तब करून इच्छुकांना धक्का दिला आहे. महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपाचे संख्याबळ १० असल्यामुळे विशाल इंगळे यांची निवड निश्चित असून, मंगळवारी त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात येईल. महापालिकेच्या आर्थिक व इतर विषयाच्या धोरणासंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार स्थायी समितीला प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे स्थायी समितीच्या सभापती पदाला मानाचे स्थान आहे. त्यामुळे अनेकांनी लॉबींग केली होती. ती सर्व नावे मागे टाकून भाजपाने शहराचे भौगोलिक व राजकीयदृष्ट्या समीकरण लक्षात घेऊन दावेदार निवडला असून, विशाल श्रावण इंगळे यांनी आज अर्ज दाखल केला आहे. स्थायी समिती सभापतीकरिता भाजपचे विशाल इंगळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सोमवारी भाजप महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांनी विशाल श्रावण इंगळे यांच्या नावाची घोषणा केली. त्यांनी तीन उमेदवारी अर्ज नगरसचिव अनिल बिडवे यांच्याकडे दाखल केले. यावेळी महापौर विजय अग्रवाल, किशोर मांगटे पाटील, स्थायी समिती सभापती बाळ टाले, गटनेता राहुल देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, सभागृहनेत्या गीतांजली शेगोकार, नगरसेवक अनिल गरड, विनोद मापारी, सुभाष खंडारे, दीप मनवानी, तुषार भिरड, नगरसेविका नंदाताई पाटील, आम्रपाली उपरवट, आरती घोघलिया, रंजना विंचनकर, अर्चना मसने, जानव्ही डोंगरे, शारदा ढोरे व सर्व भाजपा नगरसेवक, नगरसेविकांची उपस्थिती होती.

निवडणुकीच्या दृष्टिकोनातून निर्णय 

शिवणी  -शिवर हा परिसर भारिप- बमसंचा बालेकिल्ला मानल्या जातो. नगरसेवक विशाल इंगळे यांचे वडील श्रावण इंगळे यांना भारिपचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान केले होते. त्यानंतर याच भागातील भारिपचे पदाधिकारी दामोदर जगताप यांना जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदाची संधी देण्यात आली होती. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रावण इंगळे यांनी भाजपाची वाट धरली. खा. संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर यांनी मनपा निवडणुकीत शिवणी-मलकापुर प्रभागातून विशाल इंगळे, दीपाली प्रवीण जगताप यांना भाजपाचे तिकीट देऊन निवडून आणले. तसेच विशाल इंगळे यांना मनपात स्थायी समितीच्या सभापती पदाची मोठी संधी बहाल केली. अर्थातच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप नेत्यांनी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव केल्याचे लक्षात येत असले, तरी या समीकरणांची भविष्यात बेरीज होते की वजाबाकी, याचे चित्र पुढील काळात लवकरच स्पष्ट होणार आहे.

निसटता विजय अन् सभापती पदाची लॉटरीविशाल इंगळे यांनी महापालिका निवडणुकीत प्रभाग १४ मधून अवघ्या दोन मतांनी विजय मिळविला. आयुष्यातील पहिलीच निवडणूक अटीतटीची होऊन जिंकल्यावर ते आता वर्षभरातच स्थायी समिती सभापतीपदी विराजमान होणार आहेत. 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिका