शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

जीएमसीत विद्यार्थिनीचा छळ; विशेष पथकाद्वारे चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 14:23 IST

चौकशीमुळे महाविद्यालय प्रशासनासोबतच सहकारी विद्यार्थ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

अकोला: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सौजन्याची वागणूक मिळत नसल्याची तक्रार विद्यापीठाकडे केल्यानंतर उच्चस्तरीय समितीने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. यावेळी समितीने प्रामुख्याने विभाग प्रमुखांसह सहकारी विद्यार्थ्यांची चौकशी केली. या चौकशीमुळे महाविद्यालय प्रशासनासोबतच सहकारी विद्यार्थ्यांचेही धाबे दणाणले आहेत.गत आठवड्यापासून शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील दोन विद्यार्थिनींसोबत सहकारी विद्यार्थ्यांकडून सौजन्याची वागणूक मिळत नसल्याचा चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकारामुळे सहकारी विद्यार्थ्यांकडून मानसिक छळ होत असल्याची तक्रार पीडित विद्यार्थिनींनी महाविद्यालय प्रशासनासोबतच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे संचालक तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीनंतरही विद्यार्थिनींसोबत सुरू असलेला प्रकार न थांबल्याने उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली. या समितीने सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चौकशीला सुरुवात केली. यावेळी स्त्री रोग व प्रसूती शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. श्यामकुमार शिरसाम व डॉ. अपर्णा वाहाने यांची कसून चौकशी करण्यात आली. शिवाय विद्यार्थिनींचा छळ करणाऱ्या सहकारी विद्यार्थ्यांचीही चौकशी करण्यात आली. ही सहा सदस्यीय समिती औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. के.ए. एळीकर यांच्या मार्गदर्शनात चौकशी करत आहे. काही महिन्यांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या रॅगिंगप्रकरणी या विद्यार्थिनींवर कारवाई करण्यात आली होती; परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या विद्यार्थिनींना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुन्हा प्रवेशित करण्यात आले. त्यानंतर इतर सहकारी विद्यार्थ्यांकडून त्या विद्यार्थिनींना या प्रकारची वागणूक दिली जात आहे.समितीने केली चित्रफितीची पाहणीशासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुरू असलेल्या या प्रकारसंदर्भात विविध स्तरातून तक्रारी होत आहेत. चौकशीदरम्यान समितीने इतर तक्रारकर्त्यांचीही चौकशी केली. यावेळी महाविद्यालयात झालेल्या रॅगिंग प्रकरणाची चित्रफीत समितीला दाखविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.डॉ. वाहानेंचा पदभारही काढलास्त्री रोग व प्रसूतीशास्त्र विभागातील विद्यार्थिनींसोबत हा प्रकार सुरू असतानाच विभाग प्रमुख डॉ. अपर्णा वाहाने यांचा पदभार काढण्यात आला आहे. विद्यार्थिनींसोबत सुरू असलेल्या प्रकारासंदर्भात तक्रार आल्यावर विद्यापीठात महत्त्वाची बैठक पार पडली होती. यासाठी विभाग प्रमुख डॉ. वाहने यांनादेखील बोलाविण्यात आले होते; परंतु त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली नसल्याची माहिती आहे. यासोबतच त्यांच्याविरुद्ध काही तक्रारीही विद्यापीठाकडे गेल्याने त्यांचा पदभार काढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय