शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोना’साठी अकोला जीएमसीत ‘आयसोलेशन’ वॉर्ड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 11:42 IST

- प्रवीण खेते अकोला : कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी अकोल्यात स्वतंत्र आयसुलेट वॉर्डाची निर्मिती केली जात आहे. हा वॉर्ड ...

- प्रवीण खेतेअकोला : कोरोना व्हायरसच्या संशयित रुग्णांसाठी अकोल्यात स्वतंत्र आयसुलेट वॉर्डाची निर्मिती केली जात आहे. हा वॉर्ड जुन्या टीबी वॉर्डात तयार करण्यात येणार असून, त्या ठिकाणी व्हेंटिलेटरचीदेखील सुविधा करण्यात येणार आहे. हा वॉर्ड विभागातील पाचही जिल्ह्यांतील कोरोना रुग्णांसाठी उपयोगात येणार असल्याची माहिती अधिष्ठात डॉ. शिवहरी घोरपडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.कोरोना व्हायरसचा राज्यात एकही रुग्ण आढळली नसला, तरी राज्यात आरोग्य विभाग सतर्कता बाळगत आहे. आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार, राज्यभरात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जात आहे. त्या अनुषंगाने अकोल्यातही आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र आयसोलेट वॉर्डाची निर्मिती केली जात आहे. हा वॉर्ड जुन्या टीबी वॉर्डात तयार केला जाणार असून, त्या ठिकाणी व्हेंटिलेटरची सुविधादेखील केली जाणार आहे. हा वॉर्ड रुग्णालयापासून सुरक्षित अंतरावर असल्याने इतर रुग्णांचा कोरोनाच्या रुग्णांशी संपर्कयेणार नाही.मनुष्यबळही उपलब्ध करून देणारआयसुलेट वॉर्डासाठी स्वतंत्र मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. यासाठी विभागीय आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी यांनी मान्यता दिली असून, वॉर्डासाठी परिचारिकांची ड्युटी लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा साधनांचा अभावआयसुलेट वॉर्डात रुग्णसेवा देणाºया कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा साधणांची गरज आहे. सद्यस्थितीत जीएमसीत कुठल्याच प्रकारची सुरक्षा साधने उपलब्ध नाहीत; मात्र दोन दिवसात मास्क, गाऊन, बुटांची खरेदी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाºयांनी दिली.वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांना मार्गदर्शनरुग्णांवर उपचार करत असताना वैद्यकीय अधिकाºयांसह इतर वैद्यकीय कर्मचाºयांना आजाराची लागण होण्याची दाट शक्यता असते. अशा परिस्थितीत त्यांनी काय काळजी घ्यावी, या संदर्भात गुरुवार ३० जानेवारी रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. श्यामकुमार शिरसाम, डॉ. अष्टपुत्रे, डॉ. विनीत वरठे यांच्यासह अधिसेविका, अधिपरिचारिका तसेच इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कोरोना व्हायरसचा धोका पाहता जीएमसीत जुन्या टीबी वॉर्डात आयसुलेट वॉर्ड निर्मिती केली जात आहे. त्यामुळे आवश्यक सुरक्षा साधनांची खरेदी करण्यात येणार आहे. सध्या तरी हा वॉर्ड विभागातील पाचही जिल्ह्यांच्या दृष्टिकोनातून तयार करण्यात येत आहे.- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय