शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला ‘जीएमसी’चे नवे अधिष्ठाता म्हणून डॉ. अजय केवलिया रुजू

By atul.jaiswal | Updated: April 10, 2018 17:08 IST

 अकोला: गत वर्षभरापेक्षाही अधिक काळापासून प्रभारींच्या खांद्यावर असलेल्या अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास अखेर मंगळवारी नियमित अधिष्ठाता लाभले.  

ठळक मुद्देडॉ. अजय नर्मदाप्रसाद केवलिया यांनी मंगळवारी सकाळी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडून स्विकारला. पदभार स्विकारताच डॉ. केवलिया यांनी विविध विभागांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.

 अकोला: गत वर्षभरापेक्षाही अधिक काळापासून प्रभारींच्या खांद्यावर असलेल्या अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयास अखेर मंगळवारी नियमित अधिष्ठाता लाभले.  नव्याने नियुक्त झालेले डॉ. अजय नर्मदाप्रसाद केवलिया यांनी मंगळवारी सकाळी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्याकडून स्विकारला. पदभार स्विकारताच डॉ. केवलिया यांनी विविध विभागांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला.धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाची जबाबदारी सांभाळलेले डॉ. अजय केवलिया यांची अकोला ‘जीएमसी’चे अधिष्ठाता म्हणून त्यांच्या विनंतीनूसार बदली करण्यात आल्याचा आदेश वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने सोमवारी जारी केला. त्यानूसार डॉ. केवलिया हे मंगळवारी सकाळी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उप अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रशासकीय अधिकारी संजीव देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनेश नेताम, विविध विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापकांनी डॉ. केवलीया यांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ. केवलिया यांनी औपचारिकरित्या डॉ. कार्यकर्ते यांच्याकडून पदभार स्विकारला. पदभार स्विकारल्यानंतर डॉ. केवलिया यांनी महाविद्यालयातील विविध विभागांना भेट देऊन पाहणी केली. दुपारी महाविद्यालय परिषदेची बैठक घेऊन विविध विभाग प्रमुख व सहयोगी प्राध्यापकांचा परिचय करून घेतला तसेच कामाचा आढावा घेतला. 

अकोला जीएमसी हे नव्याने स्थापन झालेल्या जीएमसींपैकी बरेच पुढे आहे. डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. घोरपडे व इतर विभाग प्रमुखांनी या महाविद्यालयाची खुप प्रगती केली आहे. या सर्वांना सोबत घेऊन यापुढील वाटचाल करण्याचा प्रयत्न करणार आहे.

- डॉ. अजय केवलिया, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय