शहरं
Join us  
Trending Stories
1
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
4
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएमसी’त महागडी वैद्यकीय उपकरणे धूळ खात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 12:57 IST

तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने सर्वोपचारमधील डायलिसीस केंद्र बंद पडले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : अपुरे मनुष्यबळ हे सर्वोपचार रुग्णालयातील सर्वात मोठी व गंभीर समस्या आहे. परिणामी, रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याचे नेहमीच समोर येते. अशातच डायलिसीस, ईसीटी अन् ईईजीसारख्या वैद्यकीय उपकरणांना हाताळण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही सेवा पूर्णत: ठप्प पडली आहे.पश्चिम विदर्भातले मोठे वैद्यकीय हब म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाची ओळख आहे. म्हणूनच अकोल्यासह जवळपासच्या जिल्ह्यातील गंभीर रुग्ण येथे उपचारासाठी येतात; परंतु या ठिकाणी रुग्णांवर उपचारासाठी पुरेसे मनुष्यबळच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, अनेक वैद्यकीय सुविधा अडचणीत सापडल्या असून, डायलिसीस ही त्यातील सर्वात महत्त्वाची वैद्यकीय सुविधा आहे. तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने सर्वोपचारमधील डायलिसीस केंद्र बंद पडले आहे.वैद्यकीय उपकरण हाताळण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ नसल्याने महागळे वैद्यकीय उपकरणे जवळपास वर्षभरापासून धूळ खात आहेत. त्यामुळे सुविधा उपलब्ध असूनही किडनी आणि थॅलिसिमीयाच्या रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. हीच बाब मनोरुग्ण विभागातील ईसीटी आणि ईईजी या वैद्यकीय उपकरणांच्या बाबतीत झाली आहे.त्यामुळे जिल्ह्यातूनच नव्हे, तर जवळपासच्या जिल्ह्यातील येणाऱ्या अनेक रुग्णांना अर्धवट उपचार घेऊन खासगी रुग्णालयात जावे लागते.डॉक्टरांची नियुक्ती केली; पण उपकरण बंदसर्वोपचार रुग्णालयातील मनोविकृती विभागामध्ये सात वर्षांपूर्वी शॉक थेरेपीसाठी ईसीटी मशीन उपलब्ध करण्यात आली होती. या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर असूनही गत सात वर्षांपासून ईसीटी मशीनचा उपयोग करण्यात आला नव्हता. यासंदर्भात महाराष्ट्र रुग्णसेवक संघटनेचे महानगराध्यक्ष आशिष सावळे यांनी आॅनलाइन तक्रार केल्यानंतर जीएमसीला जाग आली. काही दिवसांपूर्वी तब्बल सात वर्षांनी हे वैद्यकीय उपकरण उपयोगात आणल्या गेले; मात्र आता उपकरण बिघडल्याने पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे.वर्ष झाले; पण तज्ज्ञ डॉक्टरच नाहीसर्वोपचार रुग्णालयात मेडिसीन विभागात केवळ तीन डॉक्टर कार्यरत आहेत. यामध्ये नेफ्रॉलॉजीस्टचे पद रिक्त आहे. नेफ्रॉलॉजीस्ट नसल्याने गत वर्षभरापासून डायलिसीस केंद्र ठप्प पडले आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालय