शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जीएमसीत आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ५० शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 11:13 IST

Surgeries on mucormycosis : सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ५० रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

ठळक मुद्देदररोज होताहेत चार ते पाच शस्त्रक्रिया जिल्ह्याबाहेरील ३२ रुग्ण जीएमसीत दाखल

अकोला : कोविडच्या दुसऱ्या लाटेसोबतच म्युकरमायकोसिसचे नवे संकट समोर आले असून, या आजाराचे रुग्ण दररोज वाढत आहेत. सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकोसिसच्या ५० रुग्णांच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. म्युकरमायकोसिसचा धोका सर्वच वयोगटात दिसून येत असल्याने कोविड रुग्णांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.

जिल्ह्यात सुमारे महिनाभरापासून म्युकरमायकोसिसचे रुग्ण समोर येऊ लागले आहे. महिनाभरात या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली असून, त्यातील बहुतांश गंभीर रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात दाखल होत आहेत. सर्वोपचार रुग्णालयात सद्य:स्थितीत ७८ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ५० रुग्णांवर गंभीर शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. म्युकरमायकोसिसच्या गंभीर रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, यातील गंभीर रुग्णांवर दररोज शस्त्रक्रिया केली जात आहे. सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत म्युकरमायकाेसिसचे ३२ रुग्ण दाखल झाल्याची माहिती आहे. या रुग्णांमध्ये वाशिम, बुलडाण्यासह अमरावती आणि सुरत येथील रुग्णांचाही समावेश आहे. अकोल्यात उपचार घेण्यासाठी जिल्ह्याबाहेरील रुग्णांची संख्या वाढत आहे.

अशी आहे सर्वोपचार रुग्णालयातील स्थिती

आतापर्यंत ७८ रुग्ण

११ रुग्ण डिस्चार्ज

१ मृत्यू

५० शस्त्रक्रिया

 

मेंदूच्या शस्त्रक्रियेसाठी रुग्ण नागपूरला संदर्भित

म्युकरमायकोसिसच्या बहुतांश जटील शस्त्रक्रिया या अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातच होत आहेत. यामध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसोबच सायनस, दातांच्या शस्त्रक्रियेचा समावेश आहे. मात्र, सर्वोपचार रुग्णालयात मेंदुरोग विकारतज्ज्ञ उपलब्ध नाही. त्यामुळे मेंदूपर्यंत पोहोचलेल्या फंगसच्या रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी नागपूर येथे संदर्भित केले जात आहे. आतापर्यंत १२ रुग्णांना नागपूरला संदर्भित करण्यात आले आहे.

म्युकरमायकोसिससाठी चार वॉर्ड राखीव

सर्वोपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. सद्य:स्थितीत सर्वाेपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिससाठी ४ वॉर्ड राखीव ठेवण्यात आले असून, त्यामध्ये ८० खाटा उपलब्ध आहेत.

सर्वोपचार रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गंभीर रुग्णांच्या शस्त्रक्रियाही होत आहे. आतापर्यंत जवळपास ५० शस्त्रक्रिया झाल्या आहे. गंभीर रुग्णांना नागपूरला संदर्भित केले जात आहे. कोविडमधून बरे झालेल्या रुग्णांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. फंगस आढळताच रुग्णांनी तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. श्यामकुमार शिरसाम, वैद्यकीय अधीक्षक, जीएमसी, अकोला

टॅग्स :Akola GMC / Sarvopchar Rugnalayअकोला जीएमसी / सर्वोपचार रुग्णालयMucormycosisम्युकोरमायकोसिसAkolaअकोला