शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अकोला फुटबॉल संघटनेवर 'विफा'ची करडी नजर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:16 IST

अकोला: अकोला जिल्हा फुटबॉल संघटना अकार्यक्षम असल्याचा ठपका लावत, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने जिल्हा संघटनेत सुधारणा आणण्यासाठी नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देस्थानिक खेळाडू व फुटबॉल क्लबची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनला तक्रार गेली . जिल्हा संघटनेत सुधारणा आणण्यासाठी नोटीस बजावली आहे. अकोला जिल्ह्यात फुटबॉल अ‍ॅक्टिव्हिटी होत नसल्याचे विफाने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे.

अकोला: अकोला जिल्हा फुटबॉल संघटना अकार्यक्षम असल्याचा ठपका  ठेवत, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनने जिल्हा संघटनेत सुधारणा आणण्यासाठी नोटीस बजावली आहे. जिल्हा संघटनेने आतापर्यंत केलेल्या कामकाजाची पडताळणी करण्यासाठी अ‍ॅडॉक समितीची नेमणूक करण्यात आली आहे.वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेने या नोटीसमध्ये १९८२ पासून संघटनेने निवडणूक घेतली नसल्याचे म्हटले आहे, तसेच संघटनेने केलेल्या कोणत्याही कार्याचा अहवाल धर्मादाय आयुक्तांकडे सोपविला नसल्याचेही नमूद केले आहे. संघटनेने फुटबॉल स्पर्धादेखील आयोजित केलेल्या नाहीत. जिल्हा संघटनेशी ४० क्लब संलग्नित आहेत; मात्र याबाबत वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनकडे अहवाल संघटनेने पाठविलेला नाही.स्थानिक खेळाडू व फुटबॉल क्लबची वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनला तक्रार गेली असून, यामध्ये अकोला जिल्ह्यात फुटबॉल अ‍ॅक्टिव्हिटी होत नसल्याचे विफाने नोटीसमध्ये स्पष्ट केले आहे. या सर्व बाबींवर वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करू न, अकोला जिल्हा फुटबॉल संघटनेवर देखरेख करण्यासाठी अ‍ॅडॉक समितीची स्थापना केली आहे. ही समिती अकोला जिल्हा फुटबॉल संघटनेने आतापर्यंत काय कामकाज केले, याचा अहवाल विफाकडे पाठविणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाFootballफुटबॉलSportsक्रीडा