शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पहिली देशी बीटी कपाशी आली फूल-पात्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 12:47 IST

हे पीक फूल-पात्यावर आले असून, यापासून चांगले उत्पादन मिळेल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.

अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधन केलेल्या देशातील पहिल्या बीटी कपाशीची पेरणी कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर करण्यात आली असून, सद्यस्थितीत हे पीक फूल-पात्यावर आले असून, यापासून चांगले उत्पादन मिळेल, असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पीकेव्ही हायब्रीड-२ तसेच परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे नांदेड-४४ (एनएच-४४) वाणात जनुकीय बदल करू न महाबीजने बीटी कापूस विकसित केला. बोंडअळी व रस शोषण करणाऱ्या किडींना प्रतिकारक्षम हे वाण असून, अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख, परभणीचे स्व. वसंतराव नाईक तसेच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठांच्या प्रक्षेत्रासह गुजरातमध्ये या वाणाचे मोठ्या प्रमाणात प्रात्यक्षिक घेण्यात आले. याच दोन्ही संकरित वाणांमध्ये जनुकीय (बीटी जीन) बदल करू न बीटी वाण विकसित करण्यात आले. यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना हे बियाणे उपलब्ध केले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती संशोधन विभागातर्गत कृषी विद्या व पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर या कपाशीच्या बियाण्यांची पेरणी करण्यात आली आहे. सद्यस्थितीत ही कपाशीची झाडे फुले-पात्यावर आली आहेत.विदर्भातील शेतकºयांना यावर्षी पीकेव्ही हायब्रीड-२ बियाणे जवळपास २३ हजार ५०० पाकिटे विकण्यात आली होती तसेच नांदेड-४४ चे बियाणे मराठवाड्यात शेतकºयांनी खरेदी केले. विदर्भात सद्यातरी बीटी कपाशी उत्तम असून, शेतकºयांच्या शेतावरही चांगले परिणाम दिसून आले आहेत. या बीटीपासून हेक्टरी २० क्ंिवटलच्या अपेक्षा आहेत. कृषी विद्यापीठाच्या पश्चिम विभागावरील कपाशीला आलेली पिवळे, पांढरी फुले येणाºया जाणाºयांना आकर्षित करीत आहेत.

 बीजी-२ कपाशी सध्या बºयापैकी आली असून, फुले-पात्या धरले आहे. आपले हे पहिले संशोधन आहे. उत्पादनही चांगले येण्याची शक्यता आहे.- डॉ. विलास भाले,कुलगुरू ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठagricultureशेती