शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : सोने लुटमार प्रकरणात पाचवा आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 01:46 IST

अकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्‍या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केली. हे आरोपी पोलीस कोठडीत असतानाच पोलिसांनी पाचव्या आरोपीस अटक केली. सुरेश रमेश महातो रा. कन्हाण असे आरोपीचे नाव आहे. नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील हे २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरातील सराफा व्यावसायिकांचे कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांचे दोन किलो सोन्याचे दागिने ८ फेब्रुवारी २0१७ रोजी लुटमार करणार्‍या चार चोरट्यांना रामदास पेठ पोलिसांनी अटक केली. हे आरोपी पोलीस कोठडीत असतानाच पोलिसांनी पाचव्या आरोपीस अटक केली. सुरेश रमेश महातो रा. कन्हाण असे आरोपीचे नाव आहे. नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील हे २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत आहेत.  ठाणे क्राइम ब्रांचने अटक केलेल्या टोळीची चौकशी केल्यानंतर त्यांनी अकोल्यातील दोन किलो सोने लुटमार प्रकरणात सहभागी असल्याची कबुली दिली होती. त्यांच्या अटकेसाठी रामदास पेठ पोलिसांचे पथक ठाण्यासाठी रवाना झाले होते. या चोरट्यांनी प्रशांत कुरियरचे संचालक प्रशांत शहा यांच्या कुरियर सर्व्हिसमध्ये आदर्श कॉलनी येथील रहिवासी हिंमत आनंदराव काकडे हा कुरियर बॉयने आणलेले १६ लाख १५ हजार रुपयांच्या दोन किलो सोन्याच्या दागिन्यांची बॅग लंपास केली होती. हा प्रकार झाला तेव्हा हिंमत काकडे यांनी आरडाओरड न करता शहा हॉस्पिटलसमोर असलेल्या त्यांच्या मालकाकडे धाव घेतली होती. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला; मात्र जवळपास एक वर्षाचा कालावधी उलटल्यावरही चोरट्यांचा शोध लागत नसल्याने पोलिसांनी या चोरट्यांची माहिती देणार्‍यांना ५0 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते; मात्र त्यानंतरही अकोला पोलिसांना यश आले नाही. दरम्यान, ठाणे पोलिसांनी या चोरट्यांना पकडल्यानंतर रामदास पेठ पोलिसांना माहिती दिली. ठाणे पोलिसांनी अटक केलेल्या नाम खरगयाल, बिरजू चहादे, विनय भोयर व लक्ष्मण पाटील या चार चोरट्यांनी ही चोरी केल्याची क बुली दिली. रामदास पेठ पोलिसांनी या चोरट्यांना अटक केली. त्यानंतर या चौघांच्या चौकशीतून कन्हाण येथील रहिवासी सुरेश रमेश महातो याला अटक केली. त्याच्यासह पाचही आरोपींना न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :ArrestअटकAkola cityअकोला शहर