शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

अकोला : सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 01:51 IST

अकोला : सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवरील मुख्य चौकात एका कर्मशियल कॉम्पलेक्सच्यावतीने उभारण्यात आलेले अतिक्रमण अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रस्त्यालगत नव्हे तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्य़ांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे

ठळक मुद्देअतिक्रमकांना महापालिकेचे अभयअकोलेकर वैतागले!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवरील मुख्य चौकात एका कर्मशियल कॉम्पलेक्सच्यावतीने उभारण्यात आलेले अतिक्रमण अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रस्त्यालगत नव्हे तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्य़ांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे. थेट मुख्य रस्त्यावर उभारलेल्या अतिक्रमणाकडे मनपाचे दुर्लक्ष होत असल्याने कोणाचे खिसे जड झाले, असा सवाल अकोलेकरांनी उपस्थित केला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ म्हणून गांधी रोडकडे पाहिल्या जाते. सोन्या-चांदीच्या दागिन्यांपासून ते रेडिमेड कपड्यांसह विविध वस्तूंची या परिसरात बाजारपेठ आहे. शहरातील खवय्यांची गांधी चौकातील चौपाटीवर चांगलीच गर्दी राहते. अर्थातच, प्रचंड गर्दीमुळे अकोलेकरांना गांधी रोडवरून चालताना अक्षरश: जीव मुठीत घेऊन चालावे लागते. गांधी रोड परिसरातील वाढत्या अतिक्रमणामुळे अकोलेकरांच्या समस्येत भर पडली आहे. गांधी चौकातील अतिक्रमकांकडे महापालिका प्रशासनाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्यामुळेच अतिक्रमकांच्या दादागिरीने उचल खाल्ली आहे. मनपाच्या आवारभिंतीलगत ‘पार्किंग’साठी जागा राखीव असताना अतिक्रमण विभागाच्या नाकावर टिच्चून रेडिमेड कापड व्यावसायिक दुकाने थाटतात. सणासुदीच्या दिवसांत अतिक्रमकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची गळ काही राजकीय पदाधिकार्‍यांकडून घातली जाते. त्याचवेळी अतिक्रमणाचा अकोलेकरांना त्रास झाल्यास हेच पदाधिकारी महापालिकेच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, हे विशेष. गांधी चौकातील एका कर्मशियल कॉम्प्लेक्सच्यावतीने सौंदर्यीकरणाच्या नावाखाली चक्क रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक उभारून त्याला लाखंडी ग्रील लावली आहे. पेव्हर ब्लॉक बसवताना मनपाचे सर्व निकष नियम पायदळी तुडवत गांधी चौकातील थेट मुख्य रस्त्याचा वापर करण्यात आला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला लघू व्यावसायिक त्यांच्या हातगाड्या लावून व्यवसाय करत असल्यामुळे मुख्य रस्त्यावरून चालावे कसे, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे. 

पार्किंगच्या जागेवर व्यवसाय कसा?गांधी चौकातील दुर्गा देवीच्या मंदिरासमोरील जागा पार्किंगसाठी राखीव आहे. तीन दिवसांपूर्वी याठिकाणी पार्किंग स्टॅन्ड निर्माण करण्यात आले. तिसर्‍याच दिवशी पार्किं गच्या जागेवर काही अतिक्रमकांनी व्यवसाय उभारल्याचे चित्र समोर आले आहे. मनपाच्या अतिक्रमण विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होतेच कसे, असा सवाल उपस्थित होतो. 

गांधी चौकातील अतिक्रमणाकडे दुर्लक्ष का?गांधी रोडवरील अतिक्रमणाचा अकोलेकरांना वैताग आला आहे. गांधी चौकात चक्क रस्त्यावरच पेव्हर ब्लॉक, लोखंडी ग्रीन उभारण्यात आल्यामुळे समस्येत अधिकच भर पडली आहे. याठिकाणी लघू व्यावसायिक, फेरीवाले, ऑटोचालकांमध्ये दररोज वादावादी-कटकटी होतात. जेसीबीचा धाक दाखवून रस्त्यालगतच्या अतिक्रमकांना हुसकावणारे अतिक्रमण विभाग प्रमुख आत्माराम इंगोले यांना गांधी चौकातील अतिक्रमण दिसत नाही का, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.-

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkola cityअकोला शहर