शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : आठ वर्षांनंतर झाली आई-वडील अन् मुलाची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 02:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आईसोबत क्षुल्लक कारणावरून २0१0 मध्ये वाद झाल्यानंतर घरून निघून गेलेला १३ वर्षांचा मुलगा तब्बल आठ वर्षांनी सोमवारी घरी परतला. आठ वर्षांपासून मुलाचा चेहरा पाहण्यासाठी आई-वडील चातकासारखी वाट पाहत होते. त्याला पाहताच आई-वडिलांचे  डोळय़ांत आनंदाश्रू  तरळले.  किसन गिरी यांचा मुलगा संदीप याचा त्याच्या आईसोबत ११ जुलै २0१0 रोजी ...

ठळक मुद्देआनंद गगनात मावेना आईशी वाद झाल्याने निघून गेलेला मुलगा परतला!

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : आईसोबत क्षुल्लक कारणावरून २0१0 मध्ये वाद झाल्यानंतर घरून निघून गेलेला १३ वर्षांचा मुलगा तब्बल आठ वर्षांनी सोमवारी घरी परतला. आठ वर्षांपासून मुलाचा चेहरा पाहण्यासाठी आई-वडील चातकासारखी वाट पाहत होते. त्याला पाहताच आई-वडिलांचे  डोळय़ांत आनंदाश्रू  तरळले.  किसन गिरी यांचा मुलगा संदीप याचा त्याच्या आईसोबत ११ जुलै २0१0 रोजी वाद झाला होता. आईसोबत वाद झाल्यानंतर संदीप रागाच्या भरात निघून गेला होता. घरून थेट अकोला रेल्वेस्थानकावर गेलेला संदीप रेल्वेत बसला आणि कोलकाता येथे पोहोचला. इकडे त्याचे आई-वडिलांनी संदीपचा शोध सुरू केला; मात्र त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. अखेर संदीपचे वडील किसन गिरी यांनी २0 जुलै २0१0 रोजी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. सिव्हिल लाइन पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला; मात्र पोलिसांनाही त्याचा पत्ता लागला नाही. दुसरीकडे कोलकातामध्ये पोहचलेला संदीप कमी वयातच स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी बनियान तयार करणार्‍या कंपनीमध्ये रोजंदारीमध्ये काम करीत होता. कंपनीच त्याचे घर झाले होते. मिळालेल्या पैशांमधून मिळेल ते खाऊन त्याने आयुष्याची वाटचाल सुरू केली. तिथे पाच वर्षे काम केल्यानंतर तो सुरत येथील प्लास्टिकच्या कंपनीमध्ये काम करण्यास गेला. गेल्या तीन वर्षांपासून तो तिथेच काम करीत असताना त्याला आई-वडिलांची आठवण झाली आणि क्षणाचाही विलंब न करता संदीपने अकोल्याचा रस्ता गाठला. अकोल्यात आलेल्या संदीपने जुन्या घराच्या पत्त्यावर आई-वडिलांचा शोध घेतला; मात्र ते हे घर सोडून केव्हाचेच गेल्याचे त्याला समजल्याने त्याला मोठा धक्का बसला; मात्र आई-वडिलांच्या भेटीसाठी आतुरलेल्या संदीपने त्यांचा अकोल्यात शोध सुरू केला अन्आई-वडील शिवणीमध्ये राहत असल्याची माहिती त्याला मिळाली. क्षणाचाही विलंब न करता संदीपने शिवणी येथील आई-वडिलांचे घर गाठले. आठ वर्षांपूर्वी गेलेला संदीप अचानक डोळय़ांसमोर उभा झाल्याने आई-वडिलांना विश्‍वास बसला नाही. दोघांच्याही डोळय़ांनी आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. संदीप आई-वडिलांच्या कुशीत एखाद्या लहान मुलाप्रमाणे गेला आणि उपस्थित असलेल्या पोलिसांसह सर्वांची डोळे पाणावले. या प्रकारानंतर पोलिसांनी संदीपचे बयाण नोंदविले.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Railway Stationअकोला रेल्वे स्थानक