शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अकोला : डॉ. पंदेकृविचा सोमवारी ३२ वा दीक्षांत समांरभ; १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष पदवी ग्रहण करणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2018 20:50 IST

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पदवी ते पीएच.डी.पर्यंत २,६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सोमवार,५ फेब्रुवारी रोजी आयोजित ३२ वा दीक्षांत समारंभात १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष स्वत: उपस्थित राहून पदवी स्वीकारतील. या  समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर असतील, तर बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती राहील.

ठळक मुद्देप्रावीण्यप्राप्त २९ विद्यार्थी सुवर्ण पदाचे मानकरी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे पदवी ते पीएच.डी.पर्यंत २,६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, सोमवार,५ फेब्रुवारी रोजी आयोजित ३२ वा दीक्षांत समारंभात १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष स्वत: उपस्थित राहून पदवी स्वीकारतील. या  समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषिमंत्री तथा कृषी विद्यापीठांचे प्रतिकुलपती पांडुरंग फुंडकर असतील, तर बिहारच्या नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विजय भटकर यांची प्रमुख उपस्थिती राहील. ते दीक्षांत भाषण करतील. यावर्षी प्रावीण्यप्राप्त २९ विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. विलास भाले यांनी रविवारी शेतकरी सदन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या स्थापनेला २0१९ मध्ये ५0 वर्ष पूर्ण होत असल्याने कृषी सुवर्ण महोत्सवाची जय्यत तयारी सुरू  केली असून, कृषी शिक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत असल्याचे डॉ. भाले यांनी यावेळी सांगितले. यावर्षी बीएससी कृषी अभ्यासक्रमाचे १,७७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उद्यान विद्याचे १२३, वनविद्या २९, कृषी जैवतंत्रज्ञान १0७, कृषी व्यवसाय व्यवस्थापन विषयाचे ३४, अन्नशास्त्र ५८ तर बीटेक कृषी अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या १२७ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे. एमएससीचे (कृषी)२३८, उद्यानविद्या  ३५, वनविद्या १0, एमटेक कृषी अभियांत्रिकी २३, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ३४, तर पीएच.डी. ४१ मिळून २,६३२ स्नातकांना पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. यातील १,८४१ विद्यार्थी प्रत्यक्ष पदवी स्वीकारतील. या समारंभाला नाबार्ड माजी अध्यक्ष उमेशचंद्र सारंगी यांची उपस्थिती राहील. यावर्षी २९ सुवर्ण, १५ रौप्य, ३१ रोख व तीन पुस्तक स्वरू पात असे ७८ पदके व बक्षिसे प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांना प्रदान केली जाणार आहेत.

टॅग्स :Akola cityअकोला शहरDr. Punajabrao Deshmukh Agriculture Collegeपंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ