शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

अकोला : ‘आरओ’ कार्यालयात जाळले भूखंड घोटाळ्याचे दस्तावेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 02:46 IST

अकोला : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अमरावती कार्यालयातील आगीत अकोला एमआयडीसीत झालेल्या भूखंड घोटाळ्य़ाचे दस्तावेज जाळण्यात आले असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी इंद्दरजसिंग छटवाल, तपस्यू मानकीकर आणि राजू कुमार जैन यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. यासंदर्भातील निवेदन एमआयडीसी सीओ कार्यालय आणि राजापेठ पोलीस ठाणेदारास देण्यात आले आहे.

ठळक मुद्देएमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अमरावती कार्यालयातील आगीत अकोला एमआयडीसीत झालेल्या भूखंड घोटाळ्य़ाचे दस्तावेज जाळण्यात आले असून, त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अकोला एमआयडीसी प्लॉट ओनर्स असोसिएशनचे पदाधिकारी इंद्दरजसिंग छटवाल, तपस्यू मानकीकर आणि राजू कुमार जैन यांनी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेतून केला आहे. यासंदर्भातील निवेदन एमआयडीसी सीओ कार्यालय आणि राजापेठ पोलीस ठाणेदारास देण्यात आले आहे.अमरावती येथील एमआयडीसीच्या आरओ कार्यालयातील आग संशयास्पद असून, त्याची चौकशी करण्यात यावी. सोबतच या आगीत भस्मसात झालेल्या अकोला, यवतमाळ येथील वादग्रस्त भूखंडांचे दस्तावेज आहेत. अकोला-अमरावती येथील दलालांनी मिळून हे वादग्रस्त दस्तावेज नष्ट केल्याचेही या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. अकोला एमआयडीसीतील भूखंड परस्पर दुसर्‍यांच्या नावे वळते करण्याचे प्रयोग झाले आहेत. यामध्ये अकोला एमआयडीसी फेज क्रमांक चारमधील एन-१६0 क्रमांकाचा सुनील मदनलाल चिराणीया आणि ट्रान्सपोर्ट नगरातील टीए ७८ क्रमांकाचा कृपा विक्रम शहा यांचा भूखंड आहे. दोन्ही भूखंड वाटपातील डिमांड ड्राफ्टचे क्रमांक आणि ते कुणाच्या खात्यातून जमा झालेत याची माहिती समोर येणार असल्याने पुरावे नष्ट करण्यात आलेत. अकोल्यातील एका नामांकित शेड्यूल बँकेचा डीडीही बनावट असण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही रेकॉर्डिंगचा डेटा तपासावा, तसेच मोबाइल संभाषणाचे सीडीआर तपासावेत, असेही निवेदनात म्हटले आहे. तत्कालीन विभागीय प्रादेशिक अधिकारी आणि अकोला क्षेत्रीय अधिकारी यामध्ये गुंतलेले आहेत. हे सर्व पुरावा दर्शविणारे दस्तावेज २५ डिसेंबर रोजी बडनेरा मार्गावरील कार्यालयात लागलेल्या आगीत संशयास्पदरीत्या नष्ट झाले आहेत. काही दलालांकडून असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत, असेही पत्रकार परिषदेतून सांगण्यात आले आहे.

असोसिएशनच्या विरोधात काढली पत्रकेअसोसिएशनच्या नावाने पदाधिकारी अधिकारी, उद्योजकांना लुटत असल्याचे सहा पानी पत्रक काढले गेले आहे. या पत्रकांवर निनावी पीडित लिहिले असून, दिल्लीपर्यंतच्या संबंधित २५ जणांना त्याच्या प्रती पाठविल्या गेल्या आहेत. त्यात असोसिएशनचे आणि अधिकार्‍यांचे संबंधही अधोरेखित करण्यात आले आहेत. या पत्रकाबाबत गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, पत्रक काढणार्‍यांनी समोर येऊन तक्रार नोंदवावी, असे आव्हान त्यांनी केले.