शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील दीड लाख हेक्टरवरील कपाशीचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 01:36 IST

अकोला :  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील सातही  तालुक्यांतील कपाशी नुकसानाचे अहवाल अखेर बुधवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ३२0 शेतकर्‍यांचे १ लाख ४४ हजार ४७८ हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी अपेक्षित १३५ कोटी ९१ लाख ९0 हजार १५0 रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे१ लाख ३४ हजार शेतकर्‍यांच्या मदतीसाठी  १३६ कोटींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला :  बोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्हय़ातील सातही  तालुक्यांतील कपाशी नुकसानाचे अहवाल अखेर बुधवारपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ३४ हजार ३२0 शेतकर्‍यांचे १ लाख ४४ हजार ४७८ हेक्टरवरील कपाशी पिकाचे नुकसान झाले असून, पीक नुकसान भरपाईपोटी शेतकर्‍यांच्या मदतीसाठी अपेक्षित १३५ कोटी ९१ लाख ९0 हजार १५0 रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने अकोला जिल्हय़ातील कपाशी पिकाच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून, संयुक्त स्वाक्षरीसह पीक नुकसानाचा अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गत ८ डिसेंबर रोजी जिल्हय़ातील तहसीलदार, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकार्‍यांना दिला होता. त्यानुसार ३ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील  अकोला, बाश्रीटाकळी, अकोट, तेल्हारा, पातूर, मूर्तिजापूर व बाळापूर  या सातही तालुक्यांतील कपाशी नुकसानाचे संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले. संबंधित तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकार्‍यांच्या संयुक्त स्वाक्षरीने सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार जिल्हय़ातील सातही तालुक्यांत १ लाख ३४ हजार ३२0 शेतकर्‍यांचे १ लाख ४४ हजार ४७८ हेक्टर ९९ आर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. बोंडअळीग्रस्त कापूस उत्पादक  शेतकर्‍यांच्या मदतीसाठी १३५ कोटी ९१ लाख ९0 हजार १५0 रुपये निधी अपेक्षित असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सातही तालुक्यातील अहवालाच्या आधारे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकार्‍यांच्या संयुक्त स्वाक्षरीचा जिल्ह्यातील कपाशी नुकसानाचा एकीकृत अहवाल शासनाकडे सादर करण्यात येणार आहे.

टॅग्स :cottonकापूसagricultureशेतीAkola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण