शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याचा ‘जेआरडी टाटा मेमोरियल’ पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 18:09 IST

अकोला: अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून, याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे.

अकोला: अकोला जिल्हा सध्या विविध विकास कामांत अग्रेसर होत आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व लिंग गुणोत्तर प्रमाणात जिल्हयाने आघाडी घेतली असून, याबददल जिल्हयाला नुकतेच जेआरडी टाटा मेमोरियल या मानाच्या पुरस्काराने नवी दिल्ली येथे गौरवण्यात आले आहे.जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला जिल्हयातील विविध विकास कामांना गती मिळाली आहे. आरोग्य, स्वच्छता व शिक्षण क्षेत्रातही अकोला जिल्हयात उत्तम कार्य होत आहे. सहाव्या जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्काराचे वितरण १२ आॅक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील हॅबिटेट सेंटर येथे पार पडले. नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांना जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह आणि दोन लाख रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरुप आहे.अकोला जिल्हयात लिंग गुणोवत्तर प्रमाणातील सुधारणा, पुरुष व महिलांचे वाढलेले साक्षरतेचे प्रमाण आणि स्वच्छतेसह पिण्याच्या पाण्याचे उत्तम स्त्रोत व पुरवठा याबददल जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार जिल्हयाला मिळाला आहे. जिल्हयाचे लिंग गुणोत्तर प्रमाण ९४६ इतके झाले असून, पुरुष व महिला साक्षरतेचे प्रमाण अनुक्रमे ९१.३ टक्के आणि ८३.५ टक्के झाले आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेमध्ये जिल्हयाने चांगले काम केले आहे. यामध्ये ९७.४ टक्के काम झाले आहे. तसेच जिल्हा हगणदारी मुक्त झाला असून सदर सर्व बदलाबददल अकोला जिल्हयाला जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार मिळाला आहे.पालकमंत्र्यांनी केला गौरवजिल्हाधिकारी यांच्या दालनात सोमवारी झालेल्या छोटे खानी कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी अकोला जिल्हयाला जेआरडी टाटा मेमोरियल पुरस्कार मिळाल्याबददल जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांचे अभिनंदन केले. स्वत: त्यांनी हा पुरस्कार जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे उपस्थित होते. या पुरस्काराच्या यशात जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वैदयकीय अधीक्षिका डॉ. आरती कुलवाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड व अन्य वैदयकीय अधिकारी व जिल्हा परिषद तसेच संबंधित विभागाचे प्रमुख यांचा महत्त्वपूर्ण वाटा असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटीलAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय