शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना मदतीची आस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 02:25 IST

गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याबाबतची आस अकोला जिल्हय़ासह अमरावती विभागातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना लागली आहे.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव;  कपाशी पिकाचे प्रचंड नुकसानहाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने, कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. हाताशी आलेल्या पिकाचे उत्पादन बुडाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे पीक नुकसान भरपाई केव्हा मिळणार, याबाबतची आस अकोला जिल्हय़ासह अमरावती विभागातील कापूस उत्पादक शेतकर्‍यांना लागली आहे.यावर्षीच्या गत पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने, खरीप हंगामातील मूग, उडिदाचे पीक बुडाले. सोयाबीन पिकाच्या उत्पादनातही कमालीची घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला. विदर्भातील पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणार्‍या कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने अकोला जिल्हय़ात कपाशी पिकाचे प्रचंड नुकसान झाले. अकोल्यासह अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशीचे पीक फस्त झाले. हाताशी आलेल्या कापूस पिकाचे उत्पादन बुडाल्याने, कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पीक नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याचा आदेश शासनामार्फत जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आला आहे. त्यानुसार पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनामार्फत सुरू करण्यात येत असले तरी, पीक नुकसान भरपाईची मदत शासनाकडून केव्हा मिळणार, याबाबतची प्रतीक्षा संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

अकोला जिल्हय़ात एक लाख हेक्टरवरील ‘कपाशी’चे नुकसान?गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनामार्फत गठित पथकांकडून करण्यात येणार आहे. तथापि, अकोला जिल्हय़ात पेरणी केलेल्या सर्वच १ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकाचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीणagricultureशेतीcottonकापूस