शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला अकोलाजिल्हा स्त्री रुग्णालयात डॉक्टरांची ‘अपॉइंटमेंट’ आता ऑनलाइन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:05 IST

डॉक्टरांची आॅनलाइन ‘अपॉइंटमेंट’ घेण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमाता व नवजात शिशूंना संसर्गापासून बचावासाठी अभिनव उपक्रमरुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यास मदत होणार आहे.हा उपक्रम सध्या तरी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत आहे.

- प्रवीण खेतेअकोला  : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता देशभरात प्रतिबंधात्मक उपयायोजनांवर जास्त भर दिला जात आहे. अशातच अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयाने रुग्ण व नातेवाइकांची गर्दी टाळण्यासाठी डॉक्टरांची आॅनलाइन ‘अपॉइंटमेंट’ घेण्यासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने नवजात शिशूंसह वृद्धांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक धोका आहे. हा धोका टाळण्यासाठी अकोल्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. माता व नवजात शिशूंना होणारा संभाव्य संसर्ग टाळण्यसाठी येथे येणाऱ्या नातेवाइकांची गर्दी नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने तपासणीसाठी डॉक्टरांची ‘अपॉइंटमेंट’आॅनलाइन पद्धतीने करावी लागणार आहे. त्यामुळे अपॉइनमेंट दिलेल्या गर्भवतींचीच वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. परिणामी रुग्णालयात होणारी गर्दी टाळण्यास मदत होणार आहे. हा उपक्रम सध्या तरी प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असून, लवकरच तो कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. शिवाय, नवजात शिशूंना बघण्यासाठी येणाºया नातेवाइकांकरिता विशेष व्यवस्था केली जाणार असल्याचेही रुग्णालय प्रशासनाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.उद््घाटन कार्यक्रम केला रद्द!जिल्हा स्त्री रुग्णालय येथे आॅनलाइन ‘अपॉइंटमेंट’ उपक्रमाचे उद््घाटन रविवार ८ मार्च रोजी नियोजित केले होते; परंतु उद््घाटन कार्यक्रमात होणाºया गर्दीपासून संसर्गाचा धोका टाळण्यासाठी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती आहे; परंतु लवकरच या उपक्रमाचे उद््घाटन केले जाणार असल्याची माहिती आहे.नातेवाइकांमध्ये केली जनजागृतीकोरोनाचा संभाव्य धोका पाहता जिल्हा स्त्री रुग्णालयात येणाºया गर्भवतींसह त्यांच्या नातेवाइकांमध्ये कोरोनाविषयी गुरुवारी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. यामध्ये गर्भवतींसह त्यांच्या नातेवाइकांनी स्वच्छता राखणे, शिंकताना रुमालाचा उपयोग करणे, नियमित हात स्वच्छ धुणे यासह नवजात शिशूंना हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे आदींबाबत जनजागृती करण्यात आली.जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोनाविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. शिवाय गर्दी टाळण्यासाठी आॅनलाइन अपॉइंटमेंट  सेवा सुरू करण्याचे विचाराधीन आहे. लवकरच हा उपक्रम सर्वसामान्यांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न आहे.- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षिका, जिल्हा स्त्री रुग्णालय, अकोला

 

टॅग्स :AkolaअकोलाLady Harding Hospitalलेडी हार्डिंग रुग्णालय