शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याचा आराखडा १५९ कोटींवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 13:26 IST

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार १२१ कोटी ९२ लाख रुपये निधीचा आराखडा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)मार्फत मंजूर करण्यात आला

अकोला: जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार १२१ कोटी ९२ लाख रुपये निधीचा आराखडा जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)मार्फत मंजूर करण्यात आला असून, त्यामध्ये अतिरिक्त ३७ कोटी ८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गुरुवारी जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी दिली. त्यामुळे जिल्ह्याचा विकास आराखडा आता १५९ कोटींवर पोहोचला आहे.जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०१९-२० या वर्षासाठी शासन निकषानुसार जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी १२१ कोटी ९२ लाख रुपयांचा आराखडा जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आला होता; परंतु विविध यंत्रणांच्या मागणीनुसार विविध विकास कामांसाठी मंजूर आराखड्याव्यतिरिक्त जिल्ह्यातील विकास कामांसाठी अतिरिक्त २४१ कोटी १५ लाख ५१ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गत २२ जानेवारी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत केली होती. त्यानुषंगाने गुरुवार, १४ फेबु्रवारी रोजी मुंबई येथे मंत्रालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी अतिरक्त ३७ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या १५९ कोटी रुपयांच्या आराखड्यास मंजुरी दिली. त्यामुळे १२१ कोटींचा असलेला जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा आता १५९ कोटी रुपयांचा झाला आहे. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या बैठकीत अर्थमंत्र्यांकडून जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली.अतिरिक्त निधीची अशी करण्यात आली होती मागणी!क्षेत्र निधी                                                           (लाखात)कृषी व संलग्न सेवा                                             २१०१.६८सामाजिक व सामूहिक सेवा                                १०५३६.८५पाटबंधारे आणि पूरनियंत्रण                               ३३३२.२३ऊर्जा                                                                   २०२९.३५उद्योग व खाण                                                   २०.००परिवहन                                                              ५९१४.००सामान्य आर्थिक सेवा                                         १८१.४०.....................................................................................एकूण                                                                  २४११५.५१

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Ranjit patilडॉ. रणजित पाटील