शहरं
Join us  
Trending Stories
1
बीडमध्ये पुन्हा अमानुष कृत्य...! डोंगरात नेऊन तरुणाला रिंगण करीत बेदम मारहाण, २० जणांविरुद्ध गुन्हा, सात जणांना अटक
2
आजचे राशीभविष्य १८ मे २०२५ : कर्क राशीला वाहन सौख्य लाभेल, मकरला नोकरीत बढतीची शक्यता
3
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी, हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रासह सहा अटकेत 
5
भुजबळांकडे कोटीची खंडणी मागणारा तोतया जाळ्यात, आयकर अधिकारी सांगून तीन वेळा साधला संपर्क
6
‘एलओसी’ ओलांडून नागपूरची महिला गेली पाकिस्तानात 
7
आजचा दिवस पावसाचा, तुरळक सरींचा 
8
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
9
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
10
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
11
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
12
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
13
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
14
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
15
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
16
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
17
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
18
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
19
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक

शिष्यवृत्ती वाटपात विभागात अकोला जिल्हा अग्रेसर

By admin | Updated: March 2, 2016 02:34 IST

पाच जिल्ह्यात ६१ हजारांवर विद्यार्थ्यांंना शिष्यवृत्ती वितरित.

संतोष येलकर/अकोलासमाजकल्याण विभागामार्फत अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमधील २ लाख ४0 हजार ९८३ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंपैकी २0 फेब्रुवारीपर्यंंत ६१ हजार ८१७ विद्यार्थ्यांंना शिष्यवृती वितरित करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हानिहाय एकूण लाभार्थी विद्यार्थी आणि त्या तुलनेत शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांंची संख्या लक्षात घेता, शिष्यवृत्ती वाटपाच्या कामात विभागात अकोला जिल्हा अग्रेसर आहे.अनुसूचित जाती, इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील इयत्ता अकरावी ते पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांंना शासनाच्या समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. महाविद्यालयांकडून प्राप्त प्रस्तावानुसार संबंधित विद्यार्थ्यांंच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाते. सन २0१५-१६ या वर्षात विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाच जिल्ह्यांतील एकूण २ लाख ४0 हजार ९८३ विद्यार्थ्यांंची शिष्यवृत्तीसाठी नोंदणी करण्यात आली. एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांंपैकी २0 फेब्रुवारीपर्यंंत विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये ६१ हजार ८१७ विद्यार्थ्यांंंना समाजकल्याण विभागामार्फत शिष्यवृती वितरित करण्यात आली. जिल्हानिहाय एकूण लाभार्थी विद्यार्थ्यांंची संख्या आाणि शिष्यवृत्ती वितरित करण्यात आलेल्या विद्यार्थिसंख्येच्या तुलनेत, शिष्यवृत्ती वाटपाच्या कामात अकोला जिल्हा विभागात सर्वांत पुढे असल्याचे असल्याचे स्पष्ट होत आहे.जिल्हानिहाय शिष्यवृती वाटप करण्यात आलेले विद्यार्थी!जिल्हा                  एकूण विद्यार्थी       शिष्यवृत्ती दिलेले विद्यार्थीअकोला                 ४३२६७                  १२0२४अमरावती              ८0२४१                    ९0९१बुलडाणा                ४९३0७                  १३५९३वाशिम                  २0८४५                  १0३५६यवतमाळ              ४७३२३                   १६७५३........................................एकूण २४0९८३                                    ६१८१७