शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्याला अतिरिक्त २३७ कोटी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 01:50 IST

अकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी अतिरिक्त २३७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी मंगळवारी अमरावती येथे आयोजित विभागीय बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

ठळक मुद्देजिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केली अर्थमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी अतिरिक्त २३७ कोटी ७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हय़ातील लोकप्रतिनिधींनी मंगळवारी अमरावती येथे आयोजित विभागीय बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.जिल्हा विकास आराखडा आणि अतिरिक्त निधी मागणीच्या विषयावर  अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती येथे विभागीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला पालकमंत्री तथा जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, खासदार संजय धोत्रे, आ. गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, महापौर विजय अग्रवाल,  जिल्हाधिकारी  आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी ज्ञानेश्‍वर आंबेकर यांच्यासह विविध विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण ) योजनेंतर्गत सन २0१८-१९ या वर्षात विविध विकास कामांसाठी विविध यंत्रणांकडून ३५२ कोटी ७२ लाख रुपयांची मागणी करण्यात आली आहे. शासनाच्या निकषानुसार  ११५ कोटी ६५ लाखांच्या आराखड्यास जिल्हा नियोजन समितीमार्फत गत महिन्यात मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित अतिरिक्त २३७ कोटी ७ लाख रुपयांच्या निधीची मागणी अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील विभागीय बैठकीत करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील विकास कामांसाठी यंत्रणांच्या मागणीनुसार २३७ कोटी ७ लाख रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा नियोजन समितीमार्फत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी या बैठकीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली.

मोर्णासाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठवा!मोर्णा नदी विकासाचा ‘डीपीआर’ करण्यात येत असून, निधीसाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी खा. संजय धोत्रे, गोवर्धन शर्मा, महापौर विजय अग्रवाल आणि जिल्हाधिकारी पाण्डेय यांनी  केली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारतींची कामे, शेतकर्‍यांचा गटशेती लक्ष्यांक वाढविणे, खारपाणपट्टय़ात ‘आरओ प्लान्ट’ उभारणे, सांस्कृतिक सभागृह, ग्रामीण भागातील रस्ते व इतर विकास कामांसाठी अतिरिक्त निधीची मागणी आहे.- डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती 

टॅग्स :Akola cityअकोला शहर