शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

​​​​​​​अकोला जिल्हा : दोन विद्यार्थ्यांसह चौघांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 02:38 IST

अकोला : पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी, ५० वर्षीय महिलेने गळफास घेतला. तर एका तरुणाने रेल्वेखाली झोकून देत मूर्तिजापूर शहरात विविध ठिकाणी आत्महत्या केल्या. सीएची तयारी करणाºया युवकाने गायगाव-अकोला रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. या घटनांनी मूर्तिजापूरसह अकोला व तेल्हारा शहरात सोमवारी शोककळा पसरली. त्यापैकी तिघे तिशीच्या आतीलच असल्याने कुटुंबियांवर आघात झाला आहे.

ठळक मुद्देएकाच दिवशी घडलेल्या आत्महत्येच्या घटनांनी हादरला जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पदवीचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी, ५० वर्षीय महिलेने गळफास घेतला. तर एका तरुणाने रेल्वेखाली झोकून देत मूर्तिजापूर शहरात विविध ठिकाणी आत्महत्या केल्या. सीएची तयारी करणाºया युवकाने गायगाव-अकोला रेल्वेमार्गावर आत्महत्या केली. या घटनांनी मूर्तिजापूरसह अकोला व तेल्हारा शहरात सोमवारी शोककळा पसरली. त्यापैकी तिघे तिशीच्या आतीलच असल्याने कुटुंबियांवर आघात झाला आहे.जिल्ह्यात दोन विद्यार्थ्यांसह चौघांनी आत्महत्या केल्याची घटना ५ मार्च रोजी उघडकीस आली. एकाच दिवशी चार आत्महत्या झाल्याने जिल्हा हादरला आहे. माना येथील नेहा नरेंद्र इंगळे ( १९) ही शिक्षणासाठी मूर्तिजापूर येथे ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर भाड्याने रुम करून राहत होती. तिने ५ मार्च रोजी घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अभ्यासात हुशार असलेली नेहा ही मूर्तिजापुरातील डॉ.आर.जे.राठोड महाविद्यालयात बी.एसस्सीच्या अंतिम वर्षाला शिकत होती. तिच्या आत्महत्येमुळे माना गावात शोककळा पसरली आहे. दुसºया घटनेत राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील हॉटेल महेकच्या टेरेसवर हैदराबाद येथील रहिवाशी मादीनी जयपाल रेड्डी(५०) यांनी नॉयलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिसºया घटनेत सचिन रमेश कावनपुरे (३०)याने दर्यापूर मार्गावरील रेल्वे पुलाजवळ रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. शहरातील दोन्ही आत्महत्याप्रकरणी पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तिसºया घटनेत मूर्तिजापूर रेल्वे पोलिसांनी अकस्मिक मृत्युची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाडे यांचे मार्गदर्शनाखाली हे.पो.काँ. संतोष धारपवार करीत आहेत.डाबकी रोड रेल्वे गेटजवळ रोमील राठी नामक एका २५ वर्षीय युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या युवकाची दुचाकी घटनास्थळाजवळच बेवारस पडून होती. डाबकी रोड रेल्वे गेटजवळ तेल्हारा तालुक्यातील वाडी आदमपूर येथील रहिवासी असलेला तसेच अकोल्यात शिक्षणासाठी असलेल्या रोमील राठी नामक २५ वर्षीय युवकाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून पोलिसांनी एमएच ३० एक्यू १८८७ क्रमांकाची दुचाकी जप्त केली आहे. ही दुचाकी मृतक युवकाची असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी डाबकी रोड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. युवकाच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. 

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्या