शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हय़ातील गरिबांच्या माथी मारण्यात येत आहे निकृष्ट तूर डाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:20 IST

अकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरिबांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देजिल्हय़ातील चार तालुक्यांत शिधापत्रिकाधारकांना तूर डाळीचे वाटप सुरू

संतोष येलकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्हय़ातील चार तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ किलो रुपये किलो दराने तूर डाळीचे वाटप सुरू करण्यात आले. पांढरी टरफले आणि शिजण्यास विलंब लागणारी ही तूर डाळ असल्याने निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरिबांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे.बाजार हस्तक्षेप योजनेत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील लाभार्थी शिधापत्रिकाधारक, अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारक लाभार्थी आणि एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थींना सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत रास्त भाव दुकानांमधून ५५ रुपये प्रतिकिलो दराने तूर डाळ वाटप करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हय़ातील शिधापत्रिकाधारकांना तूर डाळ वाटप करण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत ५00 क्विंटल तूर डाळीची मागणी करण्यात आली. त्यापैकी ८ जानेवारीपर्यंत जिल्हय़ातील अकोला, बाश्रीटाकळी, पातूर व मूर्तिजापूर या चार तालुक्यांसाठी ३५0 क्विंटल तूर डाळ महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनद्वारे जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांमार्फत प्राप्त झाली. जिल्हा पुरवठा विभागामार्फत चारही तालुक्यांत रास्त भाव दुकानांमधून उपलब्ध तूर डाळीचे वाटप शिधापत्रिकाधारकांना सुरू करण्यात आले. रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना ५५ रुपये किलो दराने वाटप करण्यात येत असलेल्या या तूर डाळीमध्ये पांढरी टरफले आहेत, तसेच बारीक दाणे असलेली ही डाळ शिजण्यासही विलंब लागतो. त्यामुळे बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत रास्त भाव दुकानांमधून निकृष्ट दर्जाची तूर डाळ गरीब शिधापत्रिकाधारकांच्या माथी मारण्यात येत असल्याची बाब समोर आली आहे. 

शासनाकडून प्राप्त तूर डाळीचे वाटप ५५ रुपये किलो दराने रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांना वाटप करण्यात येत आहे; परंतु बारीक असलेल्या या तूर डाळीमध्ये पांढरी टरफले असून, ही डाळ शिजण्यास विलंब लागतो. त्यामुळे शासकीय प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतरच ही तूर डाळ वाटप करण्यासाठी रास्त भाव दुकानांना दिली पाहिजे.-शत्रुघ्न मुंडे,अध्यक्ष, जिल्हा रास्त भाव दुकानदार संघटना

बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत जिल्हय़ातील चार तालुक्यांतील शिधापत्रिकाधारक लाभार्थींसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडून जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांमार्फत आतापर्यंत ३५0 क्विंटल तूर डाळ प्राप्त झाली आहे. उपलब्ध तूर डाळीचे वाटप रस्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारक लाभार्थींना करण्यात येत आहे.डाळ निकृष्ट असल्याबाबत तक्रार प्राप्त नाही.तक्र ार आल्यास चौकशी करू-संतोष शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी

टॅग्स :Akola cityअकोला शहरAkola Ruralअकोला ग्रामीण