शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

अकोला जिल्ह्यातील दुष्काळ विधानसभेत गाजला!

By admin | Updated: March 11, 2016 03:10 IST

अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावे दुष्काळग्रस्त जाहीर करा; रणधीर सावरकर यांची मागणी.

अकोला: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखल्या जाणार्‍या अकोला जिल्ह्यातील ९९७ गावांची पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी असताना केवळ ५५ गावांचा दुष्काळग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला. जिल्ह्यातील हजारो दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना अर्थसाहाय्य देताना झालेला भेदभाव शेतकर्‍यांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करून जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि विदर्भातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना मदत जाहीर करावी, अशी मागणी आमदार रणधीर सावरकर यांनी विधानसभेत केली. जिल्ह्यातील २0१५-२0१६ मध्ये पैसेवारी ४२ पैसे असतानासुद्धा जिल्ह्यातील ९९७ गावांपैकी ५५ गावांना अर्थसाहाय्य देण्यात आले. ९४२ गावांना या शासनाच्या मदतीपासून वंचित राहावे लागत आहेत. या संदर्भात विभागीय व जिल्ह्यातून महसूल विभागातर्फे माहिती देताना कोणती अनियमितता झाली, याची चौकशी करून हवालदिल शेतकर्‍याला मदतीचा हात शासनाने द्यावा, अशी मागणी आ. सावरकर यांनी उचलून धरली. तीन वर्षांपासून शेतकरी नापिकी आणि दुष्काळामुळे त्रस्त आहे. या देशातील अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून असल्यामुळे दुष्काळाने आलेल्या मंदीचा फटका शहरी भागातसुद्धा पडत आहे. यामुळे शेतकर्‍यांसोबत सर्वसामान्य नागरिकसुद्धा हतबल झाला आहे. त्यामुळे शासनाने शेतकर्‍यांच्या भावना समजून अकोला जिल्ह्यातील उर्वरित ९४२ गावांतील शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आ. सावरकर यांनी केली. या बाबत कृषी व महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचल्या असून, शेतकर्‍यांना शासन वार्‍यावर सोडणार नाही, त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहील, असे आश्‍वासन दिले.