शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

अकोला जिल्हय़ातील बँकांमध्ये जमा होणार दोन हजार कोटी!

By admin | Updated: November 16, 2016 02:20 IST

कर सल्लागार व ‘सीए’नी दिली माहिती

सचिन राऊत अकोला, दि. १५- केंद्र शासनाने एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर जिल्हय़ातील बँकांमध्ये तब्बल दोन हजार कोटी रुपयांच्या ठेवी जमा होणार असल्याची माहिती आहे. कर सल्लागार आणि चार्टर्ड अकाउंटंट यांनी हा अंदाज व्यक्त केला असून, यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर जिल्हय़ातील बँकांमध्ये पैसे भरणार्‍यांची मोठी गर्दी आहे; मात्र ही गर्दी करदात्यांची आहे. करदात्यांनी त्यांची रक्कम बँकेत भरण्यासाठी गर्दी केली आहे. यासोबतच शेतकरी आणि महिलांनीही त्यांच्याकडील रद्द नोट बँकेत जमा केल्या आहेत. लाखोंची आणि कोट्टय़वधी रुपयांची कमाई असलेले आणि कर चुकविणारे अद्यापही पैसे गुंतविण्यासाठी प्रतीक्षेत आहेत. विविध फंडे वापरून पैसा ह्यव्हाईटह्ण करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आहे; मात्र अद्याप त्यांनी एक हजार आणि ५00 रुपयांच्या नोटा बाहेरच काढल्या नाहीत. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी त्यांनी कर सल्लागारांच्या कार्यालयाच्या फेर्‍या मारणे सुरू केले आहे. यामधील बहुतांश पैसा हा एक नंबरमध्ये करून तो पैसा बँकेत लवकरच जमा होणार असल्याचा अंदाज कर सल्लागारांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर जिल्हय़ातील बँकांमध्ये हा आकडा तब्बल दोन हजार कोटींच्या आसपास जमा होणार असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे. रोजगार वाढेल..!शासनाच्या तिजोरीत प्रचंड पैसा आल्यानंतर विकासकामांच्या माध्यमातून तो पैसा बाहेर काढण्यात येईल. प्रत्येक गावखेड्यात मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. कामे वाढणार असल्याने रोजगारही मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे. रोजगार वाढताच बाजारपेठेत पैसा खेळता राहील आणि याचे सकारात्मक परिणाम भारताचा विकास दर वाढीवर होतील असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहेत्र.  करदात्यांची संख्या वाढेल!बँकांमध्ये मोठय़ा प्रमाणात पैसा जमा होणार असल्याने कर्ज सहज उपलब्ध होईल. कर्जाचे व्याजदर घटेल. यासोबतच गृह कर्ज सहज उपलब्ध होणार असल्याने घर, प्लॉट व फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढतील. हे व्यवहार वाढल्यानंतर नागरिक कर भरून व्यवहार करण्याला आता पसंती देतील. त्यामुळे आपोआपच करदात्यांची संख्या वाढणार आहे.  असा येईल शासनाकडे पैसा!काळा पैसा, कर चुकविण्यासाठी गोळा केलेला बहुतांश पैसा बँकेत येईल. ती रक्कम आपोआपच शासनाकडे जमा होईल. त्यामुळे शासनाच्या तिजोरीत मोठी भर पडेल. शासन या रकमेचा विकासकामांसाठी खर्च होईल. याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील.कर चुकविणारे बँकेत पैसा जमा करावा किंवा नाही यासंदर्भात विचारणा करीत आहेत; मात्र हे प्रकरण अंगलट येणार असल्याची भीती त्यांना आहे. काळा पैसा फेकल्या जाणार, हे निश्‍चित आहे. तरीही बराच पैसा अन्य खात्यात येणार असल्याने जिल्हय़ातील बँकांमध्ये दोन हजार कोटी रुपयांच्या आसपास रक्कम जमा होण्याचा अंदाज आहे.अँड. आशिष बाहेतीकर सल्लागार, अकोला.