शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण रविवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:02 IST

जिल्हा सत्र न्यायालयाची नवी इमारत लोकार्पणासाठी सज्ज झाली असून, रविवार १४ जुलै रोजी इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देन्यायमूर्ती भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.नऊ वर्षांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली. या इमारतीमध्ये १६ न्यायालये राहणार आहे.

अकोला: जिल्हा सत्र न्यायालयाची नवी इमारत लोकार्पणासाठी सज्ज झाली असून, रविवार १४ जुलै रोजी इमारतीचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असल्याची माहिती आहे.नऊ वर्षांपूर्वी जिल्हा सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली अन् काही दिवसातच इमारत बांधकामास सुरुवात झाली; मात्र मध्यंतरी इमारतीचे बांधकाम स्थगित होते. यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये जिल्हा व प्रमुख न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे रुजू झाल्यानंतर पुन्हा या कामाला गती आली. अखेर जून २०१९ मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले असून, इमारत लोकार्पणासाठी सज्ज झाली. या इमारतीचे लोकार्पण रविवार १४ जुलै रोजी होणार आहे. या सोहळ््याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती आर.के. देशपांडे, अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह, विधी व न्याय मंत्री डॉ. रणजित पाटील, नागपूर खंडपीठाचे अकोला जिल्हा न्यायालयाचे पालक न्यायमूर्ती पी.एन. देशमुख, न्यायमूर्ती एस.बी. शुक्रे, न्यायमूर्ती झेड. ए. हक, न्यायमूर्ती व्ही.एम. देशपांडे, न्यायमूर्ती आर.बी. देव, अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे व अकोला बार असोसिएशनचे अध्यक्ष एम.एल. शहा यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे. या इमारतीमध्ये १६ न्यायालये राहणार असून, यामध्ये महिलांसाठी स्तनपानासाठी स्वतंत्र दालनाची व्यवस्था, फायर स्प्रिंकलर, तसेच बार रूमची व्यवस्था करण्यात आली आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCourtन्यायालय