शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केली पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत साफ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 13:26 IST

अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेत, कार्यालयातील पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत चक्क जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी साफ केली.

- संतोष येलकर

अकोला: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाची झाडाझडती घेत, कार्यालयातील पानाच्या पिचकाऱ्यांनी रंगलेली भिंत चक्क जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी साफ केली.जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी संजय खडसे, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, मंडळ अधिकारी भगवान थिटे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकाºयांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयातील विविध विभागांची पाहणी करीत, कामकाजाची माहिती घेतली. पाहणी दरम्यान, कार्यकारी अभियंता कार्यालयाला लागूनच असलेली भिंत पानाच्या पिचकाºयांनी रंगलेली दिसताच जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय तिथे थांबले. कार्यालयातील कर्मचाऱ्याला बादली, पाणी व कापड घेऊन बोलावले आणि बादलीतील पाणी व कापडाने, स्वत: जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी पानाच्या पिचकाºया व थुंकींनी रंगलेली भिंत स्वच्छ करण्याचे काम सुरू केले. कार्यालयातील भिंत स्वत: जिल्हाधिकारी साफ करीत असल्याचे बघताच, कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तेथे जमले व आश्चर्यचकित झाले.‘साहेब, राहू द्या आम्ही करतो भिंत साफ’!कार्यालयातील भिंत जिल्हाधिकारी साफ करीत असल्याचे बघताच, तेथे उपस्थित कार्यकारी अभियंता कार्यालयातील एका महिलेने ‘साहेब राहू द्या, आम्ही भिंत साफ करतो’ असे म्हणत भिंत साफ करण्याचे काम थांबविण्याची विनंती जिल्हाधिकाºयांना केली. संबंधित महिला कर्मचाºयाच्या विनंतीवरून जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी भिंत साफ करण्याचे काम थांबविले.कार्यकारी अभियंत्यांना कानपिचक्या;सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यासंदर्भात जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांना कानपिचक्या देत, दोन दिवसात कार्यालयातील साफसफाई करण्याचे निर्देश दिले.जलसंपदा विभागातहाताने काढले जाळे!जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लागूनच असलेल्या जलसंपदा विभागाच्या कार्यालयालाही भेट देऊन पाहणी केली. त्यामध्ये एका कक्षाच्या प्रवेशद्वारावर असलेले जाळे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी स्वत:च्या हाताने काढून, कार्यालय स्वच्छ ठेवण्याच्या सूचना संबंधित कर्मचाºयांना दिल्या. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAastik Kumar Pandeyआस्तिककुमार पांडेय